Shilpa Shetty SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी पोहचली शिर्डीला; सांगितलं साईबाबांसोबतच खास कनेक्शन, पाहा PHOTOS

Shilpa Shetty Visit Shirdi : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकतेच साईबाबांचे दर्शन घेतले आहे. ती सहकुटुंब शिर्डीला बाबांच्या दर्शनाला गेली होती. खास क्षणांचे फोटो पाहा.

Shreya Maskar

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. तिचा सोशल मिडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती कायम फिटनेसचे धडे देताना पाहायला मिळते. आता नुकतेच शिल्पा शेट्टीने शिर्डीतील साईबाबांचे (Shirdi Sai Baba) दर्शन घेतले आहे. याची खास पोस्ट तिने सोशल मिडियावर शेअर केली आहे.शिल्पा सहकुटुंब शिर्डीला गेली होती.

शिल्पाने साईबाबांचे दर्शन घेतानाचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. याला तिने एक खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "शांततेत, आशीर्वाद आणि संरक्षित...ओम साई राम..." असे तिने लिहिलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तिने साईबाबा आणि आपले खास कनेक्शन सांगितले आहे.

शिल्पाने एका मिडिया मुलाखतीत सांगितले की," वर्षातून एकदा मी शिर्डीला आवर्जून येते. मला येथे आल्यावर घरचासारखे वाटते. साईबाबांच्या आशीर्वादमुळे मी आज येथे उभी आहे. साईबाबांच्या शिकवणी मी फॉलो करून जगत आहे आणि यापुढे देखील जगेन. फक्त श्रद्धा आणि सबूरी ठेवा. साईबाबा जे काही करतात ते चांगल्यासाठी असते. त्यांच्यावर विश्वास ठेवा. मी शिर्डीला येते तेव्हा कायम तयार होऊन येते. राणी कलर माझा आवडता रंग आहे."

पुढे शिल्पा म्हणाली की, " साईबाबा मला कायमच शक्ती देतात. आज आम्ही मोठा प्रवास करून येथे आलो आहे. पैशांच्या पलीकडे जाणून साईबाबांनी सुख-शांती-समाधान दिलं आहे. जे होत ते चांगल्यासाठी होत असा माझा विश्वास आहे. " शिल्पा आपल्या मुलांसोबत, नवऱ्यासोबत आणि आईसोबत साईबाबांचे दर्शन घेताना दिसली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Irshalgad Fort : रायगड फिरायला जाताय, मग इर्शाळगड पाहाच

Pune : पुण्यात उच्चभ्रू परिसरात रेव्ह पार्टी, पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली, ३ महिला अन् २ पुरूषांना बेड्या

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

Remedies On Sunday: रविवारच्या दिवशी मीठाचे उपाय करणं ठरेल फायदेशीर; करियरमध्ये लाभ होऊन नकारात्मकता दूर होईल

SCROLL FOR NEXT