Shilpa Shetty saam tv
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty : सेम टू सेम! अक्षय खन्नाच्या गाण्यावर थिरकली शिल्पा शेट्टी; हुक स्टेप्सनं वेधलं लक्ष, VIDEO

Shilpa Shetty Dance Video : अभिनेत्री शिल्पा शेट्टी 'धुरंधर' चित्रपटाची फॅन झाली आहे. तिने अक्षय खन्नाच्या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत.

Shreya Maskar

'धुरंधर' मधील FA9LA गाणे सोशल मीडियावर चांगले गाजत आहे.

शिल्पा शेट्टीने अक्षय खन्नाच्या गाण्यातील हुक स्टेप्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेत्रीने 'धुरंधर' मधील कलाकारांचे भरभरून कौतुक केले आहे.

आजकाल सर्वत्र फक्त 'धुरंधर' आणि अक्षय खन्नाची चर्चा पाहायला मिळत आहे. अक्षय खन्नाची Fa9la गाण्यातील हुक स्टेप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रत्येकजण यावर व्हिडीओ बनवत आहे. तसेच अक्षय खन्नाच्या भन्नाट स्टाइलचे कौतुक होत आहे. अक्षय खन्नाने 'धुरंधर' ला चारचाँद लावले आहेत.

'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला. 'धुरंधर' आदित्य धर दिग्दर्शित चित्रपट आहे. कंधार अपहरण आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह अनेक सत्य घटनांपासून चित्रपट प्रेरित आहे. 'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, आर माधवन, राकेश बेदी हे तगडे कलाकार झळकले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर' चित्रपटाचे बजेट 250 कोटींच्या अधिक आहे. 'धुरंधर' हा ॲक्शन चित्रपट आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 'धुरंधर' मधील अक्षय खन्नाच्या Fa9la गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. गाण्यातील अक्षय खन्नाची व्हायरल स्टेप करताना शिल्पा दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूप भन्नाट दिसत आहे. गाण्याचा पूर्ण आनंद घेताना दिसत आहे. तिने डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून त्याला हटके कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "फॅन तो मिला नहीं लेकीन मै फॅन हो गई हू, तो ये ट्रेंड करना बनता था..." तसेच तिने 'धुरंधर' मधील कलाकारांचे कौतुक देखील केले आहे.

शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'धुरंधर' ने बॉलिवूडला देखील वेड लावले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर'ने आतापर्यंत 550 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'धुरंधर' चित्रपटातील डायलॉग , गाणी सर्वच काही प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT