Kajol Devgan And Nysa Devgan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kajol Devgan: काजलने दिला लेकीला सल्ला, म्हणाली 'जर ट्रोल नाही झाली तर…'

प्रत्येक प्रश्नाच्या रोखठोक उत्तरामुळे काजोल चर्चेत राहते. पण आता काजोलने तिची लाडकी मुलगी नीसाच्या ट्रोलिंगवर मौन सोडले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kajol Devgan: काजोल बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये तिच्या हटक्या स्वभावासाठी ओळखली जाते. पण सोबतच ती मीडियासमोर तिच्या बोल्ड वर्तनामुळे चर्चेत राहते. प्रत्येक प्रश्नाच्या रोखठोक उत्तरामुळे काजोल चर्चेत राहते. पण आता काजोलने तिची लाडकी मुलगी नीसा हिच्या ट्रोलिंगवर मौन सोडले आहे. नीसा गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. तिचे हे वर्तन पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. मात्र आता या संपूर्ण प्रकरणावर काजोलने एक वक्तव्य केले आहे.

काजोलने एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा तिच्या मुलीला ट्रोल केले जाते तेव्हा तिला खूप वाईट वाटते. परंतु तिला हे देखील माहित आहे की ट्रोल करणे आता सोशल मीडियाचा एक भाग बनला आहे. तसेच पुढे काजोल म्हणते, 'मला वाटते की ट्रोल करणे आता सोशल मीडियाचा एक भाग बनलाय.'

'सोशल मीडियावर सर्वाधिक काम हे ट्रोलिंगचेच चालते. तुम्ही ट्रोल होत असाल तर तुमची दखल घेतली जाते. तुम्ही ट्रोल होत असाल तरच तुम्ही प्रसिद्ध आहात, असे सर्वत्र समजले जाते. आजच्या काळात तर अशी अवस्था झाली आहे की जर तुम्ही ट्रोल नसाल होत तर तुम्ही प्रसिद्धही होऊ शकत नाहीत.'

दरम्यान, काजोलने कबूल केले की, आपल्या मुलीला ट्रोल होत असल्याचे पाहून तिला दुःख होत आहे. सोबतच ती पुढे म्हणते, मी सर्व प्रकारचे लेख वाचले आहेत, ज्यामध्ये नीसाला ट्रोल करणाऱ्या गोष्टी लिहिल्या होत्या.

अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांना अधिक महत्त्व दिले जाते ज्यामुळे नीसाच्या बाबतीत चुकीचे मत तिच्या चाहत्यांमध्ये पसरवले गेले आहे. त्यापैकी २ गोष्टींना ठळकपणे सांगण्यात आले, जे खरंतर चुकीचे होते. यादरम्यान काजोलने असेही सांगितले की, आपल्या मुलीला या गोष्टी समजावून सांगताना ती म्हणते की नेहमी सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यावे.

काजोल लवकरच 'सलाम वेंकी' चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून हा चित्रपट माय- लेकाच्या भोवती फिरणार ा. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आयुष्य जगण्याचा संदेश देण्यात आला असून आयुष्य मोठे नसावे, मोठे असावे असे सांगण्यात आले. 'सलाम वेंकी'चे दिग्दर्शन रेवती यांनी केले असून या चित्रपटात काजोलसोबत विशाल जेठवा, राजीव खंडेलवाल आणि आहाना कुमरा यांच्याही विशेष भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी काय म्हणाले?

अस्थिविसर्जनानंतर अवघ्या 24 तासांत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री; दिवसभरात राजकीय चक्रे कशी फिरली?

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'अजितदादांच्या विचारांचा वारसा...'

IND vs NZ T20: इशान किशनकडून किवींच्या गोलंदाजांची धुलाई, ४२ चेंडूत ठोकलं शतक

राज्यात पवार नावाचं वलय कायम ठेवायचं असेल तर..., सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच मनोज जरांगेंचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT