Sharman Joshi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sharman Joshi: शर्मन जोशीने 'गोलमाल'बद्दल केला खुलासा, 'या' कारणामुळे झाले वाद

बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशी 'गोलमाल'च्या पहिल्या भागात दिसला होता. त्यानंतर तो उर्वरित भागात कुठेच दिसला नव्हता. आता अनेक वर्षांनी शर्मन जोशीनेच तो उर्वरित चित्रपटात का दिसला नाही याचा खुलासा केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sharman Joshi: दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'गोलमाल' या सुपरहिट आणि बहुचर्चित चित्रपटात लक्ष्मणची भूमिका साकारून शर्मन जोशीवर सर्वत्र कौतूकाचा वर्षाव झाला. या चित्रपटातील शर्मन जोशीची व्यक्तिरेखा सर्वांनाच आवडली होती. पण चित्रपटाच्या उर्वरित भागात तो कुठेच दिसला नाही. आता अनेक वर्षांनी शर्मन जोशीनेच तो उर्वरित चित्रपटात का दिसला नाही याचा खुलासा केला.

'गोलमाल 5' बद्दल बोलायचे झाले तर अजय देवगण पुन्हा एकदा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू आणि अर्शद वारसीही यात धमाल करताना दिसणार आहेत. 'गोलमाल' मालिकेच्या पहिल्या भागाबद्दल बोलायचे झाले तर, हा 2006 सालीच प्रदर्शित झाला होता. त्यावेळी चित्रपटात अजय, अर्शद, तुषार आणि शर्मन महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते.

एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत शर्मनने सांगितले की, त्याचे व्यवस्थापनाशी झालेल्या गोंधळामुळे तो या चित्रपटीच्या सीरिजमधून बाहेर पडला आहे. “माझे व्यवस्थापन संघासोबत व्यवस्थित संवाद झाले नाहीत. त्यामुळे चित्रपटाच्या पुढील भागांमध्ये दिसलो नाही. सोबतच चित्रपटाच्या मानधनाचाही प्रश्न मला उद्भवणारा होता. निर्मात्यांना माझी फीसुद्धा फार वाटत होती. या सर्व गोष्टी चालू आहेत हे मला माहीत नव्हते पण मला कळताच मी त्यांच्यासोबत संवाद साधला. त्यानंतर मला पैशांबाबत कोणतीही अडचण आली नाही.

शर्मन जोशीने आतापर्यंत जे काही काम केले आहे, त्याला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्याने 'स्टाईल', 'थ्री इडियट्स', 'रंग दे बसंती', 'लाइफ इन अ मेट्रो','ढोल', 'गोलमाल' आणि 'मिशन मंगल' यांसारख्या चित्रपटांमध्ये अनेक उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. त्याने आपले अभिनय कौशल्य इंडस्ट्रीत सिद्ध केले आहे. अशा परिस्थितीत तो 'गोलमाल सीरिज'च्या पुढील चित्रपटात दिसणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी?

Saturday Horoscope : मनातील इच्छा पूर्ण होणार; धन योगाला उत्तम दिवस; या राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

Maharashtra Live News Update: हवेमध्ये गोळीबार करणाऱ्या अजिंक्य कडला उरळी कांचन पोलिसांनी घेतलं ताब्यात

SBI प्रकरणात अंबानींना मोठा धक्का! मुंबई उच्च न्यायालयाने दिला दणका; नेमकं प्रकरण काय? वाचा

Manoj Jarange: रक्ताने हात माखलेल्यांनी बोलू नये, धनंजय मुंडेंना जरांगेंचा इशारा

SCROLL FOR NEXT