Raveena Tandon: रवीना टंडनला वाघाच्या जवळ जाणं भोवणार? वन विभाग कारवाई करण्याच्या तयारीत

रवीनाने वाघाच्या जवळ जाऊन व्हिडिओ बनवला आहे आणि त्यामुळे ती अडचणीत आली आहे.
Raveena Tandon Jungle Safari
Raveena Tandon Jungle Safari Saam Tv
Published On

Raveena Tandon News: अभिनेत्री रवीना टंडनला अभिनयासोबत फिरण्याचीही खूप आवड आहे. रवीना अनेकदा तिच्या ट्रिपचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. पण यावेळी रवीनला व्हिडीओ आणि फोटो शेअर करणे जबरदस्त महागात पडले आहे. फोटो शेअर केल्यामुळे रवीना पुरती अडकली आहे. रवीनाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती जंगलातील पक्षी आणि प्राण्यांसोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये वाघही दिसत आहे. रवीनाने वाघाच्या जवळ जाऊन व्हिडिओ बनवला आहे आणि त्यामुळे ती अडचणीत आली आहे.

Raveena Tandon Jungle Safari
Video: विकी-कियाराचा बाथटब रोमान्स, नेटकरी म्हणाले, इतकी सुंदर बायको असून....

व्याघ्र प्रकल्पाच्या नियमानुसार वाघापासून पर्यटकांचे अंतर 20 मीटर असावे. पण रवीनाची गाडी वाघाच्या अगदी जवळ होती. त्यावेळी तिची मुलगीही तिच्यासोबत होती. यामुळे रवीनावरच नाही तर ड्रायव्हर आणि गाईडवरही कारवाई होऊ शकते. (Celebrity)

सातपुडा व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने रवीना टंडनच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, टायगरच्या व्हिडिओ शूटींगदरम्यान नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. रवीनाने 25 नोव्हेंबरला जंगल सफारीचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये जिप्सी वाघाच्या अगदी जवळ आली होती आणि वाघ डरकाळी देत पुढे येत होता. यामुळे रवीनासोबत असलेल्या सर्वांच्या जीवाला धोका होता. (Video)

सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या नियमानुसार सफारीदरम्यान जिप्सीचे प्राण्यांपासूनचे अंतर किमान २९ मीटर असायला हवे. मात्र रवीना टंडन यांनी हे नियम पाळले नाहीत. तपासात रवीना दोषी आढळल्यास तिच्यावर कारवाई होऊ शकते.

नुकताच रवीना टंडनने मध्य प्रदेशातील वन विहारचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचा व्हिडिओ रवीनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये जंगलातील विविध प्राणांचे फोटो घेतल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे रवीनाने या सफरीमध्ये वाघांचे सुद्धा फोटो काढले आहेत. (Social Media)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com