Sara Ali Khan  Instagram
मनोरंजन बातम्या

Sara Ali Khan New Look: साराच्या नव्या लूकची नुसतीच हवा, ग्लॅमरस अंदाजातील फोटो पाहून चाहत्यांच्या भलत्याच प्रतिक्रिया

अभिनेत्री सारा अली खानने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. साराचा नवा लूक पाहून नेटकऱ्यांचे हसू आवरत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

SARA ALI KHAN VIRAL PHOTO: अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंहची लेक सारा अली खान बॉलिवूडमध्ये तिच्या बोल्ड आणि बिन्धास्त शैलीसाठी ओळखली जाते. अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. खास अदांजातील फोटो आणि व्हिडीओ नेहमीच सारा तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. हल्लीच साराचा नवा लूक पाहून सोशल मीडियावर साऱ्यांच्याच नजरा उंचावल्या आहेत.

अभिनेत्री सारा अली खानने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. साराचा नवा लूक पाहून नेटकऱ्यांचे हसू आवरत नाही. कारण या फोटोमध्ये साराच्या चेहऱ्यावर दाढी- मिशा आल्याचे दिसते आहे. स्विमिंग पूलाजवळ बसलेल्या साराच्या चेहऱ्यावर काळी दाट मिशी आणि दाढी दिसते आहे. साराच्या या हटक्या लूकची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडियावर साराची मिलियनच्या आसपास फॅन फॉलोविंग आहे. कायमच बोल्ड अदांजाने सोशल मीडियाचा पारा वाढवणाऱ्या साराने तिच्या नव्या लूकची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. साराने बिकनी लूक मधील मजेदार फोटो शेअर करत 'माझ्यातील स्त्री-रूपाला उत्तमरित्या पडद्यासमोर आणल्यामुळे धन्यवाद, होमी अदजानिया... जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा' असं म्हटलं आहे.

SARA ALI KHAN PHOTO

साराचा हा नवीन लूक कोणत्या चित्रपटातील नसून तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. या फोटोमध्ये साराच्या मागे असलेल्या काचेवर होमीचा फोटो दिसत आहे. साराने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक छोटा व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. यामध्ये ती होमीसोबत पुश-अप्स करताना दिसतेय.

दिग्दर्शक होमी अदजानियाच्या आगामी ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटात सारा मुख्य भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. तर अभिनेत्री करिश्मा कपूरचीही यात मुख्य भूमिका आहे. याशिवाय साराने लक्ष्मण उतेकर यांच्याही एका चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलंय. यामध्ये तिच्यासोबत विकी कौशलची मुख्य भूमिका आहे. जगन शक्ती यांच्याही एका चित्रपटात सारा दिसणार आहे अभिनेत्री सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सारा क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत असल्याचं बोलंल जात आहे.

Edited By- Manasvi Choudhary

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : तीन दिवसानंतर मुंबईत आता पावसाची विश्रांती

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

Beed : सरकारी वकिलाने कोर्टातच केली आत्महत्या, बीडमध्ये खळबळ

Diabetic patients: पांढरा भात खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचं काय होतं? मधुमेही रूग्णांनी भात खावा की नाही?

Mumbai Local : मुंबईकरांना मोठी भेट! नव्याकोऱ्या 268 एसी लोकल ट्रेन येणार, प्रवास गारेगार होणार!

SCROLL FOR NEXT