Sanya Malhotra On Marathi Film Instagram
मनोरंजन बातम्या

Sanya Malhotra Interview: बॉलिवूड अभिनेत्री अजय-अतुलच्या प्रेमात, नागराज मंजुळेंबद्दल म्हणाली...

Sanya Malhotra On Marathi Film: नुकताच सान्या मल्होत्राने दिलेल्या एका मुलाखतीत, मराठी भाषेवरील प्रेम व्यक्त केले असून तिने मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

Chetan Bodke

Sanya Malhotra On Nagraj Manjule: बॉलिवूडची दंगल गर्ल सान्या मल्होत्रा सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. गेल्या महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘कथल’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. नेहमीच वैविध्यपुर्ण भूमिकेत दिसणारी अभिनेत्री या चित्रपटात देखील जरा वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. तिचा ‘कथल’ हा चित्रपट गेल्या महिन्यात १९ मे रोजी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. नुकताच सान्या मल्होत्राने ‘ई-सकाळ’ सोबत चित्रपटासंबंधित संवाद साधला. त्यावेळी तिने मराठी भाषेवरील प्रेम व्यक्त केले असून तिने मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

‘ई- सकाळ’च्या फेसबुक लाईव्हमध्ये तिने संवाद साधला होता. यावेळी सान्या मल्होत्रा मुलाखतीत अस्खलित मराठी बोलली आहे, मुलाखतीत सान्या म्हणते, “ माझे मराठी भाषेविषयी खूपच प्रेम आहे. मला मराठी भाषा शिकायची आहे. चित्रपटाच्या सेटवर मला मराठी भाषा नेहमीच ऐकू येते. मी अनेकदा सेटवर क्रू मेंबर्स सोबत किंवा इतरांसोबत मराठी भाषेत बोलण्याचा प्रयत्न करते. मी सैराट चित्रपट चारवेळा पाहिला होता आणि तेवढ्या वेळा तो चित्रपट हाऊसफुल्ल होता. मला हा चित्रपट तिसऱ्या आणि चौथ्यावेळी समजला. तेव्हापासून मला मराठी भाषेबद्दल खूपच आवड निर्माण झाली आहे.”

“मला महाराष्ट्राचे लाडके गायक अजय- अतूल यांची मराठी गाणा देखील फार आवडतात. मी नेहमीच मराठी गाणी ऐकत असते. मला बोलायला आणि ऐकायला मराठी भाषा फार आवडते. जर मला वेळ मिळाला तर, त्यावेळात मराठी भाषा शिकण्याची मला इच्छा आहे. मला जरी मराठी बोलायला येत नसलं तरी, मराठी भाषा मला समजते. माझा असिस्टंट नेहमीच माझ्यासोबत मराठी भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो, अनेकदा तो मला मराठी भाषा बोलायला शिकवतो देखील. सोबतच माझ्या चुका देखील सुधरवण्याचा तो प्रयत्न करतो. ” (Marathi Film)

सोबतच पुढे मुलाखतीत सान्या म्हणते, “मला सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासोबत जर काम करण्याची संधी मिळाली तर, त्यांच्यासोबत मी काम करेल. मी त्यांना पुर्वी एकदा भेटले होते. त्यावेळी मी त्यांना मी तुमच्या चित्रपटात मला काम करायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती. आणि जरी मला खरंच त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर, मी नक्कीच काम करेल.

‘कथल’ चित्रपटात दंगल गर्ल सान्या मल्होत्रासोबत, अनंत जोशी, विजय राझ, राजपाल यादव, बिजेंद्र काला हे सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

SCROLL FOR NEXT