Ali Fazal-Richa Chadha Wedding Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Richa Ali Wedding: रिचा-अलीचे ऐतिहासिक स्थळी होणार लग्न; अनेक ऐतिहासिक गोष्टींनी चाहत्यांचे वेधले लक्ष

गेल्या कित्येक दिवसांपासून रिचा-अलीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. अनोखी लग्न पत्रिका, विवाहस्थळ हे मुद्दे चाहत्यांच्या आकर्षणाचा मुद्दा ठरला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: गेल्या कित्येक दिवसांपासून रिचा-अलीच्या (Richa Ali Wedding) लग्नाची चर्चा सुरु आहे. अनोखी लग्न पत्रिका, विवाहस्थळ हे मुद्दे चाहत्यांच्या आकर्षणाचा मुद्दा ठरलाय. लवकरच रिचा-अली लग्नबंधनात अडकणार आहेत. दिल्लीला (Delhi) रवाना होण्याआधी विमानतळावर (Airport) पापाराझींनी या जोडीला कॅमेऱ्यात कैद केले आहे.

विमानतळावर रिचा-अली दोघेही दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. रिचा यावेळी देसी लूकमध्ये दिसत असून तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तिच्या साध्या देसी लूकने पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद केले. तसेच अलीही यावेळी निळ्या ब्लेझरसोबत टी-शर्ट आणि जिन्स घातलेला दिसला.

रिचा-अली यांचे लग्न दिल्लीत होणार असून २९ सप्टेंबरपासून लग्नाच्या विधीला सुरुवात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिचा-अली यांच्या मेहेंदीचा कार्यक्रम दिल्लीतील एका बंगल्यात होणार आहे. त्या बंगल्यात रिचाच्या बालपणाच्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. मेहेंदीनंतर त्याच बंगल्यात संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी काही खास मित्रपरिवार आणि नातेवाईक या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले आहे.

रिचा-अली येत्या ४ ऑक्टोबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. रिचा-अलीचे लग्न बिकानेरमधील १७५ वर्ष जुने दागिने तयार करुन घेतले आहेत तर १७६ वर्ष जुन्या एका क्लबमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धावत्या रेल्वेत महिलेने शिजवल्या नूडल्स; व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासन भडकले|VIDEO

ChatGPT वर आता ग्रुप चॅट करता येणार; Open AI चा नवा फंडा; कसं वापरायचं?

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा, प्रेक्षकांनी खुर्च्या तोडल्या, पडदे फडले पाहा धक्कादायक VIDEO

Pune Crime : नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध, भावानेच भावाची केली हत्या

SCROLL FOR NEXT