Richa Chaddha  Instagram/ @therichachadha
मनोरंजन बातम्या

Richa Ali Wedding : रिचा-अली दिल्लीतील ऐतिहासिक स्थळी करणार प्री वेडिंग शूट

प्रत्येकालाच या जोडप्याच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. रिचा आणि अली येत्या ऑक्टोबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडमधील (Bollywood) नेहमीच चर्चित असलेल्या कपलपैकी एक कपल म्हणजे रिचा चढ्ढा (Richa Chaddha) आणि अली फजल (Ali Fazal). गेल्या अनेक दिवसांपासून यांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होते. प्रत्येकालाच या जोडप्याच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. रिचा आणि अली येत्या ऑक्टोबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहे. रिचा-अली लग्नबंधनात २०२० मध्येच अडकणार होते, परंतू कोरोना महामारीमुळे तारीख पे तारीख चालू होती. रिचा-अली यांचे प्री-वेडिंग शूट होणार असून दिल्लीच्या (Dellhi) आयकॉनिक हॉटेलमध्ये (Iconic Hotel) होणार असल्याचे समजत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, रिचा-अली यांचे लग्न दिल्लीतल्या प्रसिद्ध दिल्ली जिमखाना क्लबमध्ये होणार आहे. हे क्लब 1913 मध्ये बांधले होते. या ऐतिहासिक क्लबच्या सदस्यांमध्ये अनेक दिग्गज मंडळींच्या नावांचा समावेश आहे. रिचा आणि अलीने 2020 मध्येच वेडिंग प्लॅनिंगही केले होते. पण कोरोना महामारीमुळे त्यांना वाट पाहावी लागली. मात्र आता या दोघांचे लग्न अगदी राजेशाही थाटात पार पडणार आहे.

या क्लबमध्ये सर्व सोयी-सुविधाही उपलब्ध आहेत. दिल्ली जिमखाना क्लब हे देशातील सर्वात जुने आणि सर्वात खास ठिकाणांपैकी एक आहे. या क्लबच्या सदस्यत्वासाठी जवळपास 37 वर्षांची वेटिंग लिस्ट लागत असल्याचे सांगितले जाते. या महिन्याच्या अखेरीस रिचा-अलीच्या प्री-वेडिंग सोहळ्याला सुरुवात होईल.

दिल्लीत प्री-वेडिंग सेलिब्रेशन पार पडल्यानंतर ६ ऑक्टोबरला मुंबईत रिचा-अली विवाहबद्ध होणार आहेत तर 7 ऑक्टोबरला रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. अली फजल आणि रिचा चड्ढा आपल्या रिलेशनशिपबद्दल कायमच मनमोकळेपणाने चर्चा करत असतात. अली-रिचाची जोडी ‘फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’ चित्रपटात एकत्र झळकली होती. रिल लाईफ जोडीने रिअल लाईफ कपल होण्याच्या दृष्टीने 2015 मध्ये सुरुवात केली.

74 व्या व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये अलीच्या ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’ या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता. त्यावेळी अली आणि रिचा यांनी आपल्या नात्यावर स्पष्ट बोलले होते. 2015 मध्ये डेटिंग सुरु झाल्यानंतर पाच वर्षांनी त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला.

Edit By- Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ukshi waterfall : डोळ्यांचे पारणे फेडणारा उक्षी धबधबा, रत्नागिरीतील अनमोल सौंदर्य

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Aadhaar Update: आधार अपडेटचा नवीन नियम! आता घरबसल्या करा कौटुंबिक माहितीत बदल, प्रोसेस काय? वाचा सविस्तर

Railway Update : १२ तासानंतर हार्बर रेल्वेसेवा सुरळीत; मध्य आणि पश्चिम रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

Kareena Kapoor : कोल्हापुरी चप्पल अन् समुद्रकिनारा; करीनाचा देसी स्वॅग, Pradaला टोमणा मारत म्हणाली...

SCROLL FOR NEXT