अभिनेत्रीनं पतीसोबतचा खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर चुकून केला पोस्ट, आता म्हणतेय...

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने पती विवेक दहियासोबतचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
Divyanka Tripathi And Vivek Dahiya
Divyanka Tripathi And Vivek Dahiyasaam tv

मुंबई: टिव्हीवरील 'ये है मोहब्बतें' या मालिकेतून रातोरात प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. दिव्यांका तिच्याविषयीच्या अपडेट देत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोशल मीडियावरही अभिनेत्री फोटो व्हिडिओ शेअर करते. आतादेखील दिव्यांकाने सोशल मीडियावर (Social Media)एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. दिव्यांकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने पती विवेक दहियासोबतचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिव्यांकाने हा व्हिडिओ चुकून पोस्ट केल्याचा खुलासा केला आहे. दिव्यांकाने व्हिडिओ असंच एडिट करत होतो आणि याचवेळी तो चुकून शेअर झाला आहे परंतु आता त्याचा आंनद लुटा असा आशय दिला आहे. दिव्यांकाने तिचा खासगी व्हिडिओ पोस्ट केला आहे.

व्हिडिओमध्ये दिव्यांका पती विवेक दहियासोबत पावसाचा मनसोक्त आनंद लुटताना दिसते आहे. रोमँटिक इंग्लिश संथगतीच्या म्यूझिकवर दोघेही मज्जा करत आहे. दिव्यांकाने हा व्हिडिओ चुकून पोस्ट केल्याचे म्हटले असले तरी चाहत्यांना कपलचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. चाहते त्यांच्या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्याच्या एकाने चाहत्याने 'कृपया अशा चुका करत राहा, आम्हाला ते आवडते' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने 'अरे किती सुंदर चूक आहे.' असे लिहिले आहे.

Divyanka Tripathi And Vivek Dahiya
लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे निधन
Divyanka Tripathi And Vivek Dahiya
बिग बॉस 16 मध्ये दिसणार हर्षद; ये रिश्ता क्या कहलाता है' सोडणार?, चर्चेला उधाण

वर्कफ्रंटविषयी बोलायचे तर आगामी काळात एका नवीन वेब प्रोजेक्टमध्ये दिव्यांका झळणार आहे. दिव्यांकाने ऑल्ट बालाजीच्या 'कोल्ड लस्सी और चिकन मसाला' या वेब सीरिजमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या दिव्यांका तनवीर बुकवालाच्या डिंग इन्फिनिटी आणि जिओ स्टुडिओच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. दिव्यांका शेवटची 'खतरों के खिलाडी' 11 मध्ये दिसली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com