Raveena Tandon On Tip Tip Barsa Pani Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raveena Tandon On Tip Tip Barsa Pani: ‘टीप टीप बरसा पानी’च्या शूटिंग दरम्यान का घाबरली होती रविना?, केला स्वत:च खुलासा

Raveena Tandon Reveals Tip Tip Barsa Pani Song Conditions: ‘टीप टीप बरसा पानी’ हे गाणं काही इतकं सहजच रित्या तयार झालेलं नाही. यामध्ये निर्मात्यांनी अनेक बदल केले होते, त्यानंतर रवीनाने त्या गाण्यासाठी होकार दर्शवला होता..

Chetan Bodke

Raveena Tandon Statement: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनने 90 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. रविना टंडनच्या मोहरा या चित्रपटातील ‘टीप टीप बरसा पानी’ हे गाणं खूपच सुपरहिट ठरले होते. या गाण्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. प्रेक्षकांनी देखील या गाण्यामुळे तिच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला होता. या गाण्यामुळे तिला वेगळी ओळख मिळाली. तसंच तिची चाहत्यांमध्ये एक वेगळीच प्रतिमा तयार झाली होती. आज या गाण्याला जवळपास 29 वर्ष पूर्ण झाली आहेत. चित्रपटातून अक्षय आणि रविनाची सुपरहिट ठरलेल्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच भावली. नुकताच रविनाने या गाण्याच्या शुटींगबद्दल काही महत्वाचे खुलासा केला आहे.

शब्बीर बॉक्सवाला निर्मित ‘मोहरा’मध्ये अक्षय आणि रविनाची जोडी प्रेक्षकांना फारच भावली. ‘टीप टीप बरसा पानी’ हे गाणं इतक्या सहजच रित्या तयार झालेलं नाही. यामध्ये निर्मात्यांनी अनेक बदल केले होते, त्यानंतर रविनाने त्या गाण्यासाठी होकार दर्शवला होता. ‘द न्यू इंडियन’ संकेसस्थळाला दिलेल्या मुलाखतीत, या गाण्यासंबंधित रविनाने महत्वाचे गुपित उघड केले आहेत. (Bollywood Film)

अलीकडेच चित्रपटाचे निर्माते आणि लेखक शब्बीर बॉक्सवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाण्याच्या शूटिंगआधी रवीना टंडन नर्व्हस होती. जेव्हा तिला त्याचं कारण विचारलं तेव्हा ती याबद्दल मोकळेपणाने बोलली. रविना म्हणते, जेव्हा तिला त्या गाण्याबद्दल सांगितले तेव्हा, तिला वाटले की हे खूप सेन्श्युअस गाणे असेल, पण त्या गाण्याची शूटिंग ज्या पद्धतीने निर्मात्यांनी केली, ते पाहून मला खूप झाला. ‘मोहरा’मध्ये ‘टिप-टिप बरसा’ आणि ‘जुबान पे जो नहीं आये’ या गाण्यांनी तिची सेन्श्युअस शैली दाखवली. यावर पुढे रविना म्हणते, ‘मला वाटतं सेक्शुॲलिटी आणि सेन्श्युॲलिटी यात अगदी थोडंसं अंतर आहे.’

मुलाखतीत पुढे रविना म्हणते, सेक्सी दिसण्यासाठी माझ्या मते पूर्ण कपडे घातले असते तरी 'सेक्सी' दिसू शकले असती. हे सर्व समोरच्या व्यक्तीच्या हावभावावरच अवलंबून आहे. या गाण्याबाबतही असेच काहीसे झाले. माझी साडी काढण्यात येऊ नये, असं मी शूटिंगपूर्वीच निर्मात्यांसमोर स्पष्ट केलं होतं. कुठलाही किसिंग सीन नसावा, असंही मी नमूद केले होतं. शूटिंग करताना मी अनेक निर्मात्यांसमोर माझ्या अटी ठेवल्या होत्या. पण जेव्हा शूटिंग झालं त्यावेळी मला कळलं की यापेक्षा परफेक्ट बॅलन्स असू शकत नाही.

यापूर्वी, बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत, ‘मोहरा’चे चित्रपटाचे निर्माते आणि लेखक शब्बीर बॉक्सवाला म्हणाले होते, रवीनाला माहित होतं की हा एक चांगला चित्रपट आहे. पण तरी ही देखील ती ‘टीप टीप बरसा पानी’ हे गाणं शूट करताना घाबरली होती. रविना म्हणते, तिच्या वडिलांना हे गाणं आवडणार नाही. रवीनाचं हे बोलणं ऐकून चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव राय गमतीने म्हणाले की , मग हा चित्रपट तुझ्या वडिलांना दाखवू नकोस आणि तसंच घडलं. हा चित्रपट आणि गाणं शूट करणण्यासाठी रवीना तयार झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT