The Kerala Story Sequel: सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. चित्रपटाला देशातील अनेक राज्यांमध्ये विरोधाचा सामना करावा लागत असला तरी, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एका महिन्याच्या आतच २०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी दिग्दर्शकांनी तर आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल महत्वपुर्ण माहिती दिली आहे. निर्माते विपुल शाह यांनी डीएनए या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल महत्वपुर्ण माहिती दिली आहे.
निर्माते विपुल शाह यांनी डीएनए या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल म्हणाले, “ ‘द केरला स्टोरी २’ बनवता येईल अशी माहिती दिली आहे, कारण हा विषय अद्याप संपलेला नाही. मी आता लाईन चित्रपटाचा भाग नाही. पण तो विषय अजून संपलेला नाही. काळजी करू नका आम्ही लवकरच कळवू.” निर्मात्यांच्या या वक्तव्यानंतर 'द केरळ स्टोरी'चा दुसरा भाग येऊ शकतो. अशी चर्चा सध्या होत आहे.
चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर २२४. ४७ कोटींची कमाई केली आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाला स्थान मिळाले. केरळ, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध सहन करावा लागला होता. सोबतच काही राज्यांमध्ये प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे राज्य सरकारने करमुक्त चित्रपट म्हणूनही घोषणा केली. त्यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि हरियाणा या राज्यांनी तिथल्या प्रेक्षकांना टॅक्स फ्री चित्रपट दाखवला.
बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातल्यानंतर लवकरच ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अद्याप याबद्दल निर्मात्यांनी किंवा दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट झी ५ (Zee 5) ला डिजीटल राईट्स दिले आहेत. पुढच्या माहिन्यात हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो, अशी माहिती सध्या मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.