Actor Harish Pengan Passes Away: टॉलिवूडवर शोककळा! 'या' प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, 49 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

actor harish pengan: चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
actor harish pengan passes away
actor harish pengan passes awaySocial Media
Published On: 

South Film Industry: बॉलिवूडपासून (Bollywood) दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी (South Film Industry) आणि टीव्ही इंडस्ट्रीला एकापाठोपाठ एक धक्के मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींच्या निधनामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. अशातच टॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. मल्याळम चित्रपट अभिनेते हरीश पेंगन (Actor Harish Pengan) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 49 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

actor harish pengan passes away
Aamir khan On Kapil Sharma: “मी तुझा मोठा चाहता आहे पण...” म्हणत अमिरने केली कपिलची भरकार्यक्रमात तक्रार

हरीश पेंगन यांचे 30 मे रोजी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून हरीश पेंगन आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. यकृताशिसंबंधीत आजार आणि इतर काही गंभीर समस्यांमुळे ते त्रस्त होते. रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे टॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोटदुखीच्या तक्रारीनंतर हरीश पेंगन यांना मे महिन्याच्या सुरुवातीला कोची येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर काही चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर हरीश पेंगन यांची प्रकृती गंभीर असल्याचे आढळून आले. हरीश पेंगन यांचे यकृत प्रत्यारोपण करावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या बहिणीने यकृत दान करण्यास होकार देखील दिला होता.

actor harish pengan passes away
Oh My God 2 Latest Update: अक्षयची चाहत्यांना गुड न्यूज, ‘ओह माय गॉड २’ रिलीज होणार ‘या’ ठिकाणी...

यकृत प्रत्यारोपणासाठी 30 लाख रुपयांची गरज होती. यासाठी हरीश पेंगन यांची बहीण आणि मित्रांनी पैसे देखील गोळा करण्यास सुरुवात केली. पण हरीश पेंगन यांची प्रकृती सतत खराब होत गेली. त्यानंतर 30 मे रोजी दुपारी 3.25 वाजता त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. हरीश पेंगन यांच्या निधनामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. हरीश पेंगन यांनी 'महेशिनते प्रथिकारम', 'हनी बी 2.5', 'जानेमन', 'जया जया जया हे' आणि 'मिनल मुरली' सारख्या चित्रपटात दमदार अभिनय केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com