Raveena Tandon Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raveena Tandon: रवीना टंडन आणि तिच्या ड्रायव्हरवरील आरोप खोटे?, समोर आला नवीन CCTV Video

Priya More

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tondon) सध्या चर्चेत आली आहे. रवीना टंडन आणि तिच्या ड्रायव्हरवर कारने तीन महिलांना धक्का दिल्याचा आणि त्यांना मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे रवीना टंडनला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. पण आता रवीना टंडनच्या घराबाहेर राड्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवरून रवीना टंडन आणि तिच्या ड्रायव्हरवर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले जात आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये रवीना टंडनच्या कारचा कोणालाही धक्का लागला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. रवीनाच्या कारचा धक्का लागल्याचा आरोप करत काही लोकांनी तिला आणि तिच्या ड्रायव्हरला घेरण्याचा प्रयत्न केला आणि तिला धक्काबुक्की केली होती.

काही वेळापूर्वी रवीना टंडनच्या घरासमोरील एक व्हिडीओ व्हायरल होत होता. या व्हिडिओमध्ये, रवीनाला तिच्या घराबाहेर काही लोकांनी घेरलेल्याचे दिसत होते. रवीना आणि तिच्या ड्रायव्हरवर कारने तीन महिलांना धक्का दिल्याचा आणि त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी अभिनेत्रीला धक्काबुक्कीही करण्यात आली असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत होते. रवीना यावेळी सर्वांना 'प्लीज-प्लीज, धक्का देऊ नका. मला मारू नका' असे म्हणतानाही व्हिडीओमध्ये ऐकू येते होते. याच व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने असाही दावा केला होता की, 'तो बरेच तास खार पोलिस स्टेशनमध्ये उभा आहे. परंतु कोणीही त्याची तक्रार नोंदवत नाही.'

मात्र या व्हिडीओनंतर अवघ्या काही तासांमध्ये सोशल मीडियावर दुसरा व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ रवीना टंडनच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्यामध्ये या संपूर्ण प्रकरणातील सत्य कळून येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, काही महिला रवीनाच्या घरासमोरून निघून जात आहेत आणि तेवढ्यात रवीनाची कार आली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे रवीनाच्या कारने तिथून जाणाऱ्या कोणत्याही महिलेला धडक दिली नाही.

न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, रवीना टंडनच्या कारने महिलांना धडक दिली नसल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून सिद्ध झाले आहे. तसेच ड्रायव्हरने या महिलांभोवती कार फिरवून ती पार्क केल्याचे फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते आहे. तर काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यूजर्स त्यावर प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.

या व्हिडीओवर कमेंट्स करत एका युजरने लिहिले की, 'त्यामुळे आपल्या आजूबाजूला सीसीटीव्ही असणे खूप महत्त्वाचे आहे.' हा व्हिडीओ शेअर करताना दुसऱ्या यूजरने लिहिले की, '#CCTV सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की अभिनेत्री रवीना टंडनच्या कारने कोणत्याही महिलेला धडक दिली नाही..!! महिलांकडून कारने धडक दिल्याचा दावा केला जात होता. या सीसीटीव्हीमध्ये ते कुठेच दिसत नाही. #रवीनटंडन'.' याशिवाय आणखी एका युजरने लिहिले की, 'हे सीसीटीव्ही फुटेज रवीना टंडनच्या केसशी संबंधित आहे, जे स्पष्टपणे दाखवते की ही केस पूर्णपणे खोटी आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT