ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक प्रेस येवू लागल्या आहेत,ज्याने काहि मिनटांतच कपडे इस्त्री होऊन निघतात. इलेक्ट्रॉनिक प्रेसमुळे जास्त मेहनत आणि वेळ लागत नाही.
समजा तुम्हाला तातडीने कुठेतरी जायचे आहे आणि लाईट गेलेली आहे, तर तुम्ही तुमच्या कपड्यांना इस्त्री कशी कराल? लाईटशिवाय इस्त्री चालत नाही.
तर जाणून घ्या लाईट गेल्यावर कपड्यांना इस्त्री करण्याचे काही सोपे टिप्स.
एका भांड्यात पाणी उकळवून घ्या आणि नंतर ते एका मगमध्ये ओता. कपडा सपाट पसरवा आणि नंतर तो मग त्या कपड्यावर फिरवा . कपड्यावर पडलेल्या घड्या नाहीशा होतील.
कोळशाचा वापर करूनही कपड्यांना इस्त्री करता येते. पूर्वी अशाच प्रकारे कपडे प्रेस केले जात असे. फक्त एका भांड्यात किंवा पात्रात थोडा कोळसा जाळा.
कपड्याच्या साहाय्याने कोळशाचे भांडे धरा आणि कापडाला कापडावर घासून हळुवारपणे प्रेस करा. काळजी घ्या, कारण यामुळे कापड जळू शकते.
जर तुमच्याकडे १ तासाचा वेळ असेल तर कपड्यांना धुवून काढा आणि चांगले पिळून घ्या.धुतलेल्या कपड्यांना जोरात झटका आणि उन्हात सुकत टाका. असे केल्यास कपड्यांवर असलेल्या घड्या निघून जातात.
तु्म्ही बिना लाईटशिवाय सुध्दा प्रेसचा वापर करु शकता. तवा गरम करा आणि त्यावर इस्त्री ठेवा. असे केल्यास इस्त्री गरम होईल.आता गरम इस्त्रीने कपड्यांना सहजपणे इस्त्री करा. अशा प्रकारे तुम्ही विजेविना कपड्यांवरील पडलेल्या घड्या काढू शकता.