Rakhi Sawant's Brother Arrested Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant's Brother Arrested: राखी सावंतच्या भावाला पोलिसांनी केली अटक, नेमकं काय आहे प्रकरण?

Mumbai Police News: अटकेनंतर राकेशला न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला 22 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Priya More

संजय गडदे, मुंबई

Mumbai News: बॉलिवूडची (Bollywood) ड्रामा क्वीन अर्थात अभिनेत्री राखी सावंतच्या (Actress Rakhi Sawant) भावाला अटक करण्यात आली आहे. चेक बाउन्स प्रकरणी राकेश अनंत सावंत (Rakesh Sawant) याला ओशिवरा पोलिसांनी (Oshiwara Police Station) अटक केली आहे. अटकेनंतर राकेशला न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला 22 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेक बाऊन्स प्रकरणी राकेश सावंत अटक करण्यात आली आहे. तीन वर्षांपूर्वी व्यावसायिकाच्या तक्रारीवरून कोर्ट केस क्रमांक 96/ss/2021 कलम 138 अ जामीन पात्र वॉरंटवर राकेश सावंतला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने याप्रकरणाच्या सुनावणी दरम्यान राकेशला पैसे परत करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता.

न्यायालयाने आदेश देऊन देखील राकेश सावंतने व्यावसायिकाला पैसे परत केले नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरोधात अटक वॉरंट काढले. त्यानंतर रविवारी रात्री ओशिवरा पोलिसांनी राकेश सावंत याला अटक केली. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. तर न्यायालयाने त्याला 22 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

यापूर्वी देखील एका प्रकरणी राकेश सावंतला पोलिसांनी अटक केली होती. टीव्ही मालिकेत काम करणारी अभिनेत्री ऋतू खन्नाची छेड काढल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पोलिसांनी कारवाई करत अटक केली होती. याप्रकरणी अटकेनंतर काही तासांतच राकेशची जामिनावर सुटका करण्यात आली होती. याप्रकरणात सुटका झाल्यानंतर राकेशने स्वत:ला निर्दोष असल्याचा दावा केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

माजी मुख्य निवडणूक आयुक्त देश सोडून पळाले? व्होटचोरीच्या आरोपामुळे परदेशात पलायन?

Meningitis Symptoms : जास्त डोकेदुखी धोकादायक! ही लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या

Maharashtra Rain: राज्यात इतका धुव्वाधार पाऊस पडतोय कसा? पुढील 4 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे!

Panvel Election: पनवेल विधानसभेत ८५ हजार दुबार मतदार, खोपोलीनंतर पनवेलमधील घोळ उघड

SCROLL FOR NEXT