The Kerala Story Day 4 Collection: देशभरात विरोध होऊनही सलग चौथ्या दिवशी जबरदस्त कमाई

पहिल्या विकेंडला दमदार कमाई करणाऱ्या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात कशा प्रकारे बॉक्स ऑफिसवर कलेक्शन केलंय जाणून घेऊया.
The Kerala Story Day 4 Collection
The Kerala Story Day 4 CollectionSaam Tv
Published On

The Kerala Story Day 4 Box Office Collection: अदा शर्मा स्टारर ‘द केरला स्टोरी’ चित्रपट सध्या कमालीचा चर्चेचा विषय ठरला आहे. सर्व विरोध आणि अनेक वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच कथेवरून देशातील अनेक राज्यांत त्याला विरोध दर्शवला जात आहे.

तामिळनाडू, पश्चिम बंगाल अनेक राज्यात विरोध दर्शवला जात असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी चित्रपटाला पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या विकेंडला दमदार कमाई करणाऱ्या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात कशा प्रकारे बॉक्स ऑफिसवर कलेक्शन केलंय जाणून घेऊया.

The Kerala Story Day 4 Collection
Adipurush Trailer Leaked: जय श्री राम! प्रदर्शनापूर्वीच 'आदिपुरुष'च्या ट्रेलरची चर्चा

बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने पहिल्या विकेंडला तीन दिवसातच जवळपास ३३.३५ कोटींची धमाकेदार कमाई केली आहे. चित्रपटाची ओपनिंगच जवळपास ६.७५ कोटी रुपयांची होती, तर शनिवारी आणि रविवारी चित्रपटाने कमाईच्या बाबतीत गगन भरारी घेतली आहे. जरीही चित्रपटाला देशभरात विरोध होत असला तरी, उत्तरप्रदेशात आणि मध्यप्रदेशात या चित्रपटाला टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला.

The Kerala Story Day 4 Collection
The Kerala Story Controversy: घरातून एकटे बाहेर पडू नका... 'द केरला स्टोरी'च्या क्रू मेंबरला धमकी

पहिल्या रविवारी चित्रपटाने चांगलीच कमाई केली होती. रविवारी ‘द केरला स्टोरी’ने बॉक्स ऑफिसवर १६ कोटी रुपयांची कमाई केली. आता निर्मात्यांसह सर्वांच्याच नजरा चौथ्या दिवसाच्या कमाईवर आहेत. सोमवार आणि चित्रपटाच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीचा दिवस सिनेमासाठी फार महत्त्वाचा होता. सुदीप्तो सेन दिग्दर्शित चित्रपटाने सोमवारी चौथ्या दिवशी वीकेंडसारखीच कमाई केली आहे. चौथ्या दिवशी चित्रपटाने भारतभर १०.५० कोटींची कमाई केली आहे.

‘द केरला स्टोरी’ चित्रपट ३ मुलींवर आधारित आहे. त्यांचे मत परिवर्तन करून धर्मांतर करण्यात आले. त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्यांना ISIS या दहशतवादी संघटनेत सहभागी करण्यात आले.

या चित्रपटामध्ये सुरुवातीला ३२००० मुलींची कथा दाखविण्यात आली होती. परंतु हा आकडा खूप मोठा असल्याने चित्रपटाला विरोध होत आहे. दक्षिण भारतात या चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. अनेक ठिकाणी चित्रपटाला प्रदर्शनासाठी बंदी घातली आहे. असे असले तरी या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस वाढत आहे.

या चित्रपटाला विरोध होत असताना अनेक हिंदू संघटनांनी या चित्रपटाला समर्थन दिले आहे. तर अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी देखील चित्रपटाला पाठिंबा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com