Rakhi Sawant Latest News Saam TV
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant: दिवाळीनिमित्त राखीने केली नौटंकी; चाहते म्हणतात, 'ही तर दुसरी उर्फीच...'

दिवाळीच्या खरेदीसाठी राखी सावंत लोखंडवाला येथे पोहोचली. यावेळी तिने लाइटिंग वायरला स्वतःला गुंडाळून घेत त्यापासून तिने दिवाळीचा ड्रेसही बनवला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rakhi Sawant Diwali Special Look: काहीतरी हटके करण्याच्या तयारीत बॉलिवूडमधील (Bollywood) अभिनेत्री नेहमीच तयारीत असतात. आपल्या हटक्या कृतींमुळे त्यांची सोशल मीडियावर भरपूर चर्चा होत असते. त्यातीलच एक अभिनेत्री राखी सावंत. राखीच्या विचित्र कृतींमुळे चाहत्यांच्या नजरेसमोर येत असते.

कुठे ही, कोणत्याही अवस्थेत आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी राखी (Rakhi Sawant) तत्पर असते. एकदा राखीने हॉस्पिटलमध्येही एक डान्सचा व्हिडिओ शूट करत आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला होता. सोशल मीडियावर राखीचे अनेक फनी व्हिडिओ, रस्त्यावरचा डान्स, वादग्रस्त वक्तव्य व्हायरल होत असतात. अशातच राखीचा आणखी एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral Video)

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सध्या सगळेच दिवाळीच्या खरेदीत व्यग्र आहेत. अगदी कलाकारांपासून जनसामान्यांपर्यंत. राखी सावंतही दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडली. दिवाळीच्या खरेदीसाठी राखी सावंत लोखंडवाला येथे पोहोचली. यावेळी तिने लाइटिंग वायरला स्वतःला गुंडाळून घेत त्यापासून तिने दिवाळीचा ड्रेसही बनवला. या ड्रेसमध्ये ती कशी दिसते हेही तिनं पापाराझींना विचारलं. तिचा ड्रामा पाहून व्हिडिओवर भन्नाट कमेंट येत आहेत.

व्हिडिओत राखी म्हणते, 'ही लाइटिंग वायर गरम झालीये. मी याला चिटकले नाही म्हणजे बरं. नाहीतर माझी आत्मा इथे भटकेल. भूतनी, चुडैल बनून तुमच्या दुकानात बसून राहिल'. राखी सावंतचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तिच्या या नौटंकीची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

'राखीजी खूपच फनी आहे, तरी म्हटलं सकाळपासून घरातली लाइट का गेलीये, बिनधास्त गर्ल, ती आपलं मनोरंजन करण्याचा एकही चान्स सोडत नाही, अशा अनेक कमेंट व्हिडीओवर येत आहेत. अनेक जण म्हणतात की हिला उर्फीची हवा लागली आहे.

बिग बॉसमुळे ही राखी चर्चेत आली होती. राखीचे काही दिवसांपूर्वी घटस्फोटही झाले होते. अशातच राखी आणि तिचा नवा बॉयफ्रेंड आदिल खान सोबत चर्चा होत आहे. कधी कधी त्यांच्या लग्नाच्या चर्चेलाही बरेच उधाण येते. अनेकदा त्यांना पापाराझींनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT