Rakhi Sawant-Adil Khan Marriage Controversy  Instagram @rakhisawant2511
मनोरंजन बातम्या

Adil Khan Durrani Arrest: राखी सावंतच्या पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नेमकं काय आहे प्रकरण?

आदिल खान दुर्रानीला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे.

Chetan Bodke

Adil Khan Durrani Arrest: बिग बॉस फेम राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीवर गंभीर आरोप करणाऱ्या राखीने आपली फसवणूक आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केल्याने आदिलला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

राखीने सोमवारी मुंबईच्या ओशिवरा पोलिस स्थानकाच्या बाहेर हजेरी लावली होती, त्यावेळी राखीने आदिलने मला सोडले आहे आणि तो त्याच्या गर्लफ्रेंडकडे निघून गेला आहे, असे सांगितले. या सर्व प्रकारानंतर आदिल खान दुर्रानीला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. वृत्तानुसार, तो राखीला भेटण्यासाठी गेला असता तिथे पोलिसांनी त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, राखीने आदिलविरोधात एफआयआर दाखल केली आहे. त्यांच्या दोघांचेही लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर काही आठवड्यांतच राखी आणि आदिल यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. आदिलवर आरोप करताना राखीने पापाराझींसोबत तिच्या भावना शेअर केल्या होत्या. राखीच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना आदिलने ठामपणे सांगितले की, तो तिला कधीही सोडणार नाही आणि या सर्व काळात तिच्यासोबत नेहमी आहे.

राखी सावंत सोमवारी ओशिवरा पोलिस स्टेशनबाहेर दिसली होती. तिच्या तक्रारीनंतर पती आदिल याला मंगळवारी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतू त्याचा विवाहबाह्य संबंध असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आदिलने राखीकडून यापुर्वी पैसे घेतले होते, आईच्या आजारपणात तिने त्याच्या कडून पैसे मागितले असता,त्याने पैसे दिले नाही. त्याच्यामुळेच आईचे निधन झाल्याचा आरोप तिने केला.

अभिनेत्रीने आदिलवर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोपही केला होता. सोबतच राखी दावा करत म्हणते, त्याने तिचा वापर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि बॉलिवूडमध्ये स्टार बनण्यासाठी केला आहे. आदिलवर म्हैसूरमध्ये अनेक गुन्हे दाखल असून तो दोन दिवस तुरुंगात होता, असा दावाही तिने केला. या प्रकरणातील अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT