Bollywood Actress Rakhi Sawant Herself Gave Information About The Health Condition Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Hospitalized: कॅन्सरच्या चर्चादरम्यान राखी सावंतने स्वत:च हॉस्पिलमधून दिले हेल्थ अपडेट, कधी होणार सर्जरी?

Rakhi Sawant Health Update: राखीने एका मुलाखतीतून प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे. सध्या तिची प्रकृती गंभीर असून तिची अँजिओग्राफी करण्यात येत असल्याचे सांगितले. सर्जरी केव्हा होणार ? याबद्दलची माहितीही तिने दिली.

Chetan Bodke

गेल्या दोन दिवसांपासून बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिला रुग्णालयात ॲडमिट केले आहे. छातीत तीव्र वेदना होत असल्याने राखीला मंगळवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनेत्रीची अचानक तब्येत बिघडल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला.

राखीचा Ex Husband रितेश सिंहने राखीच्या गर्भाशयात १० सेंटीमीटरचा ट्यूमर आहे. सध्या अभिनेत्रीवर कॅन्सरसंबंधित टेस्ट सुरू आहेत. नुकतंच राखीने एका मुलाखतीतून प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे. सध्या तिची प्रकृती गंभीर असून तिची अँजिओग्राफी करण्यात येत असल्याचे सांगितले. डॉक्टर शनिवारी तिच्यावर शस्त्रक्रिया करणार आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाला राखी सावंतने सांगितले की, "मी लवकर बरी होईल, सध्या मी आजारी आहे. माझ्या गर्भाशयात १० सेंटिमीटरच्या ट्यूमर आहे, त्याच्यावर शनिवारी उपचार केले जाणार आहे. तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे मी तुमच्या सोबत जास्त बोलू शकत नाही. पण रितेश तुम्हाला माझ्या हेल्थबद्दल वेळोवेळी माहिती देत राहिल. मला माझं ब्लड प्रेशर आणि इतर गोष्टीही नियंत्रणात आणायच्या आहेत. मी एक अभिनेत्री आहे, डॉक्टर नाही. त्यामुळे मला या सगळ्याबद्दल फारशी माहिती नाही."

राखीने पुढे सांगितले की, " या हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर फार काळजी घेणारे आहेत. ते आपली कामगिरी अगदी व्यवस्थित पद्धतीने बजावत आहेत. मी जीवनात केव्हाही हार मानलेली नाही. मी बालपणापासूनच अनेक अडथळ्यांवर आणि अनेक अडचणींवर मात करून इथपर्यंत आली आहे. मी आता ऑपरेशन थिएटरमध्ये लढायला चालले आहे, असं बोलून राखी रडते. माझ्या पाठी माझ्या आईचा आशिर्वाद आहे. ती नेहमीच माझ्यासोबत आहे. मी फायटर आहे आणि मी पुन्हा येतेय."

मुलाखतीत पुढे राखी म्हणाली, " फक्त छोटाच ट्यूमर आहे, काळजी करू नका मी लवकरच बरी होईल. मी पुन्हा येऊन नाचणार आणि गाणार. मलाच माहित नव्हतं मला ट्यूमरचं निदान झालेलं आहे. सर्व रिपोर्ट आल्यानंतर मला माहित झालं. मी लवकरच तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होतेय."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, आरपीआयची मागणी

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT