Kriti Sanon Launch Production House Instagram
मनोरंजन बातम्या

Kriti Sanon Launch Production House: ‘आदिपुरूष’नंतर क्रितीची नवी भूमिका, क्रितीच्या नव्या प्रोडक्शन हाऊससोबत सुशांतचा नेमका काय संबंध?

Producer Kriti Sanon News: क्रितीने आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरुवात करण्याचे ठरवले आहे.

Chetan Bodke

Kriti Senon And Sushant Singh Rajput News: ‘आदिपुरूष’चित्रपटातील सीतेची भूमिका साकारणाऱ्या क्रिती सेनॉनची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. आपल्या अभिनायतून आणि फॅशनमुळे चर्चेत राहणारी क्रिती सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या क्रितीने ‘आदिपुरूष’मधून सीतेची भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकण्यात अयशस्वी ठरलेल्या अभिनेत्रीच्या कामाचे प्रेक्षकांनी तोंडभरून कौतुक केले. नुकतंच क्रितीने आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरुवात करण्याचे ठरवले आहे.

अप्रतिम अभिनय कौशल्यातून क्रिती सेनॉन आता निर्माती बनली आहे. चाहत्यांसोबत ही गुड न्यूज देत ​तिने मंगळवारी तिच्या प्रोडक्शन हाऊसची घोषणा केली. तिने प्रोडक्शन हाऊसचे नाव ‘ब्लू बटरफ्लाय’ फिल्म्स ठेवले आहे. यावेळी तिने तिच्या नव्या इनिंगला सुरूवात केली असून चाहत्यांनी तिला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मात्र क्रितीच्या या नव्या प्रोडक्शन हाऊसचे नाव ऐकून चाहत्यांना सुशांत सिंग राजपूतची आठवण झाली आहे. काहींनी तर तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, क्रितीला सुशांत आवडायचा. तर काहींच्या मते, क्रितीने आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून सुशांत सिंह राजपूतला मानवंदना दिली आहे.

क्रितीच्या नव्या प्रोडक्शन हाऊसचे नाव ‘ब्लू बटरफ्लाय’ असे असून तिच्या प्रोडक्शन हाऊसच्या लोगोवर कंपनीचे नाव आणि त्याच्या बाजूला निळ्या रंगाचा फुलपाखरू पाहायला मिळतो. यावरूनच सोशल मीडियावर क्रितीच्या प्रोडक्शन हाऊससोबत सुशांतचा संबंध असल्याची चर्चा होत आहे.

सध्या एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्या व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये एका युजरने सुशांतला प्रश्न विचारलेला की, “तू नेहमीच ब्लू बटरफ्लायचा इमोजी का वापरतोस? यामागे काही खास कारण आहे का?” यावर सुशांतने खूप सुंदर दिलं होतं,तो म्हणालेला, “हे विना अडचणीने चालत राहण्याचे एक प्रतीक आहे. हे आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील सुंदर प्रतीक आहे.”

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशांतचे आणि क्रिती एकमेकांना अनेक काळ डेट करत होते. रिया चक्रवर्तीला डेट करण्यापूर्वीच सुशांत क्रितीला डेट करत होता, अशी अनेकदा चर्चा देखील झाली आहे. पण त्यांच्या नात्यात कालांतराने काही आलबेल नव्हतं, त्यांच्यात वादाचे खटके उडाले आणि ते वेगळे झाले. सर्वांप्रमाणेच क्रितीलाही सुशांतच्या निधनाचा मोठा धक्का बसला होता. मात्र, क्रितीने तिच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव असे का ठेवले? तिने अद्याप याचा खुलासा केलेला नाही.

मुख्य बाब म्हणजे, क्रितीच्या मुख्य प्रोडक्शन हाऊसचा ‘दो पत्ती’ हा आगामी थ्रिलर सिनेमा नेटफ्लिक्सवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात क्रितीसोबत काजोल देवगण देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दो पत्तीची स्क्रिप्ट अतिशय उत्तम थ्रिल आणि सस्पेन्सचा अनोखा मिलाफ असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री काजोलने दिली. या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात क्रिती आणि लेखिका कनिका ढिल्लन पदार्पण करणार आहे. काजोल आणि क्रिती सेनन यांनी ८ वर्षांपूर्वी ‘दिलवाले’मध्ये एकत्र काम केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT