Singer Coco Lee Dies : प्रसिद्ध हॉलिवूड गायिकेचे निधन : ४८ व्या वर्षी संपवले जीवन

Coco Lee End Her Life : कोको लीनी हॉंगकाँगमधील क्वीन मेरी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.
Pop Singer Coco Dies
Pop Singer Coco DiesInstagram
Published On

Hollywood Singer Coco Lee Dies at 48 : अमेरिकन गायिका आणि गीतकार कोको लीचे निधन झाले आहे. वयाच्या 48 वर्षीय कोको ली यांनी 5 जुलै रोजी जगाचा निरोप घेतला.

कोको लीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ती कोमात गेली होती. कोको लीच्या मृत्यूची माहिती तिच्या बहिणी कॅरोल आणि नॅन्सी ली यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

कोको लीचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला आणि सध्या ती तिथेच राहते. कोको लीनी तिथल्या क्वीन मेरी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

Pop Singer Coco Dies
Salaar Teaser: प्रभासचा ॲक्शनपॅक अंगावर शहारे आणणारा ‘सालार’चा टीझर प्रदर्शित, उत्कृष्ट अभिनयाने लावले चार चाँद

बहिणींनी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'कोको लीने नैराश्याशी लढण्यासाठी डॉक्टरांची मदत घेतली आणि नैराश्यातून बाहेर येण्याचा खूप प्रयत्न केला. पण तिच्या आतल्या राक्षसाने तिला खाल्ले. 2 जुलै रोजी गायिका कोको लीने घरी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, 'रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने कोको लीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. ती कोमात गेली होती आणि 5 जुलै रोजी तिने अखेरचा श्वास घेतला.

कोको ली 30 वर्षांपासून संगीत उद्योगात कार्यरत होते. अ लव्ह बिफोर टाइम या ऑस्कर नामांकित गाण्यावरही तिने परफॉर्म केले.

1975 मध्ये हाँगकाँगमध्ये जन्मलेले कोको ली कुटुंबातील सर्वात लहान होती. तिच्या जन्मापूर्वीच वडिलांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर आई तिला आणि इतर दोन मुलींना घेऊन प्रथम अमेरिका आणि नंतर सॅन फ्रान्सिस्कोला घेऊन गेली.

1992 मध्ये ग्रॅज्युएशननंतर, कोको लीला हाँगकाँगमधील कॅपिटल आर्टिस्ट्ससोबत रेकॉर्डिंग करायची ऑफर देण्यात आली. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com