Preity Zinta Use Chulha Shimla Home Instagram
मनोरंजन बातम्या

Preity Zinta At Shimla: प्रीती झिंटाला चुलीवरच्या जेवणाची भुरळ; माहेरच्यांसाठी बनवला खास मेन्यू

पती जीन गुडइनफ आणि मुलं जय आणि जियासोबतचे शिमल्यातील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Chetan Bodke

Preity Zinta Use Chulha Shimla Home: नेहमीच चित्रपटांमुळे चर्चेत राहणारी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. प्रीती सध्या धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढत आपल्या माहेरच्या माणसांसोबत खास वेळ घालवताना दिसत आहे. पती जीन गुडइनफ आणि मुलं जय आणि जियासोबत सध्या प्रीतीसोबत शिमल्यात आहेत. सध्या त्यांचे शिमल्यातील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अशातच प्रीतीचा चुलीवर जेवन बनवतानाचा एक फोटो बराच व्हायरल होत आहे. चुलीवर जेवन बनवतानाचा हा फोटो सर्वांच्याच मनावर राज्य करून जातना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये प्रीती शिमल्याच्या पहाडीत वापरल्या जाणार्‍या पारंपारिक चुलीवर जेवण बनवताना दिसत आहे. या फोटोंच्या माध्यमातून प्रीती पुन्हा एकदा आपलं माहेरपण अनुभवताना दिसतेय. फोटोमध्ये प्रीतीने सलवार सूट परिधान केला असून तिने स्वेटरही घातला आहे. सोबतच स्कार्फने डोकं झाकलेलं दिसत आहे. फोटोंमध्ये ती चुलीवरील आग फुकनीने पेटवण्याचा करताना दिसत आहे. सोबतच घरातील सदस्यांसाठी खास गावरान पद्धतीने जेवण बनवताना दिसत आहे. शिमल्यात जेवण बनवतानाचा फोटो प्रीतीने सोशल मीडियावर नुकताच शेअर केला असून त्यावर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया देत तिचे कौतुक केले.

फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये प्रीतीमध्ये, ‘जुन्या आठवणींना उजाळा द्या आणि नवीन आठवणी बनवा. आमच्या पहाडी घरांमध्ये स्वयंपाकघरात सर्वच कामं करत आहेत. इथे मी आग पेटवण्याचा आणि जुना स्टोव्ह वापरण्याचा प्रयत्न करत आहे.’

हा फोटो शेअर केल्यानंतर प्रीतीचा साधेपणा चाहत्यांना फारच भावलेला दिसत आहे. तिच्या या फोटोंवर युजर्सकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. एका युजर कमेंट करत म्हणतो, ‘हे अगदी खरं आहे मॅडम, डोंगरावरील घरांमध्ये स्वयंपाकघरात सर्व काही केलं जातं, तुम्हाला असं पाहून खूप आनंद झाला. तुम्ही जगात कुठेही जा मॅडम. यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतो..’ तर आणखी एक म्हणतो, ‘हे खूप सुंदर आहे, सोनेरी वर्षांच्या सोनेरी आठवणी परत आल्या. त्यातले काही दिवस मी स्वतः जगत होतो.’

शिमला सफर करताना प्रीतीने आपल्या कुटुंबासोबत, हाटेश्वरी देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी तिने मंदिरात आपल्या दोन्ही मुलांच्या हस्ते देवीचा अभिषेक केला. यावेळी ती फारच आनंदित असून तिचे आणि तिच्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.

प्रीती मुळची शिमलाची असून तिचा जन्मदेखील तिथेच झालाय. अमेरिकेत राहणारी प्रीती सध्या भारतात आयपीएलच्या निमित्ताने आली आहे. तिचा हा खास लूक पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adani Group News : हिंडनबर्ग प्रकरणी अदानी ग्रुपला सेबीकडून क्लीन चिट, गौतम अदानी म्हणाले...

Face Care: चाळीशीतही २५ वर्षांच्या मुलीप्रमाणे ग्लो हवा आहे? मग घरी तयार केलेला 'हा' अँटी-एजिंग फेस मास्क नक्की ट्राय करा

Pitru Paksha 2025: महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरच नाही तर देशातील ७ प्रसिद्ध ठिकाणीही श्राद्ध, पिंडदान करतात

Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, रस्ते जलमय; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर, VIDEO

Donald Trump: अपघातातून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प; हवेतच होणार होती दोन विमानांची धडक

SCROLL FOR NEXT