Poonam Pandey Saam Tv
मनोरंजन बातम्या

Poonam Pandey Net Worth: काँट्रोव्हर्सी क्वीन पूनम पांडे किती कोटींची आहे मालकीण; जगतेय ऐश आरामात

Chetan Bodke

Poonam Pandey Net Worth

गेल्या काही दिवसांपूर्वी मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या निधनाचे वृत्त आले आणि तिचे सर्वच चाहते थक्क झाले. अभिनेत्रीने निधनाचा खोटा बनाव रचून पब्लिसिटी स्टंट केल्यामुळे तिला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले.

काही दिवसांपूर्वी तिने स्वत:च्याच निधनाची अफवा पसरवली होती. त्यानंतर तिने स्वत:च व्हिडीओ पोस्ट करत आपण जिवंत असल्याचे सांगितले होते. हे सर्व गर्भाशयाच्या तोडांच्या कॅन्सरबाबत (Cervical Cancer) जनजागृती करण्यासाठी केले असल्याचे पूनम पांडेने सांगितले होते.

कायमच आपल्या वादामुळे चर्चेत राहणाऱ्या पूनमचा आज वाढदिवस आहे. आज अभिनेत्री आपला ३३ वा वाढदिवस साजरा करते. आज आपण तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत. (Bollywood)

पूनम पांडे सिने इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. त्यानंतर तिने २०१३ मध्ये आलेल्या 'नशा' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड एन्ट्री केली होती. पूनमने आपल्या सिनेकरियरमध्ये, टेलिव्हिजन सिरीयल व्यतिरिक्त अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने यातून भरपूर कमाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूनम पांडेला रिॲलिटी शो लॉकअपसाठी एका आठवड्याला ३ लाख रुपये इतके मानधन आकारयची. (Bollywood Actress)

पूनम मॅग्झिन फोटोशूट आणि मॉडेलिंगमधून प्रचंड पैसा कमावते. मीडिया रिपोर्टनुसार, पूनमकडे एक ॲप देखील आहे. त्या ॲपवर पूनमकडे ३२ लाखांहून अधिक पेड सब्सक्रायबर्स आहेत. त्या ॲपच्या माध्यमातूनही ती कोट्यवधी रूपये कमावते. पूनम पांडेच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, पूनम पांडेची एकूण संपत्ती सुमारे ५२ कोटी रुपये इतकी आहे. पूनम पांडेचे मुंबईतल्या वांद्र्यामधील पॉश एरियामध्ये स्वतःचे अपार्टमेंट आहे. तिच्या या आलिशान अपार्टमेंटची किंमत करोडोंमध्ये आहे. (Bollywood News)

पूनम पांडे आणि वाद हे समीकरण आपण अनेकदा पाहिले आहे. पूनम पांडेकडे लक्झरी आणि महागडी BMW 5 सीरीज सेदान कार देखील आहे. ज्याची किंमत ५५ लाखांपेक्षा जास्त आहे. पूनम पांडे अभिनय आणि मॉडेलिंगसोबतच जाहिरातींमधून भरपूर कमाई करते. पूनम पांडे एका चित्रपटासाठी सुमारे 1 कोटी रुपये फी घेते. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: आमदार भारती लवेकर समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सोशल माध्यमातून पोस्टरबाजी

VIDEO : स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी' बिघाडी होणारच; एकनाथ शिंदेची मविआतील वादावर टीका !

Tasgaon Vidhan Sabha : तासगावमध्ये होणार घड्याळ- तुतारीत काट्याची लढत; भाजपचे नेते घड्याळ घेऊन उतरणार मैदानात

Health Tips: टोमॅटो आणि काकडी एकत्र खाताय? त्या आधी हे वाचा...

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अँजिओप्लास्टीनंतर पहिल्यांदाच समोर, एक शब्द अन् कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT