Nushrratt Bharuccha Instagram/ @nushrrattbharuccha
मनोरंजन बातम्या

Nushrratt Bharuccha: 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री शूटिंगवेळी जखमी; रुग्णालयातील Video केला शेअर...

अभिनेत्री नुसरत भरूचा ही पुन्हा शूटिंगदरम्यान जखमी झाली आहे.

Chetan Bodke

Nushrratt Bharuccha Injured During Film Shooting: 'सोनू की टीटू की स्वीटी' आणि 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री नुसरत भरूचा ही पुन्हा शूटिंगदरम्यान जखमी झाली आहे. तिनं आपल्या इन्स्टा स्टोरीवर व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली आहे.

नुसरत भरूचा फिल्म इंडस्ट्रीत आल्यानंतर तिला सुरुवातीच्या काळात अनेक नकारात्मक भूमिका मिळाल्या. चित्रपटात प्रमुख भूमिका मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली, असं तिनं अनेकदा मुलाखतींमध्ये उघडपणे सांगितलं आहे. विशेष म्हणजे एखाद्या चित्रपटात तिला प्रमुख भूमिका मिळाली तरी, कुठेतरी नकारात्मक परिणाम झाल्याचं बघायला मिळायचं. 'सोनू की टीटू की स्वीटी' आणि 'प्यार का पंचनामा' हे चित्रपट उदाहरणे म्हणून सांगता येतील.

आता नुसरतला तिच्या मनाप्रमाणं चित्रपट आणि भूमिका मिळत आहेत. पण तिच्याबाबतीत दुर्दैवाचा फेरा म्हणावा लागेल अशा घटना घडत आहेत. शूटिंगवेळी वारंवार ती जखमी होत आहे.

नुसरतला पुन्हा दुखापत

नुसरत भरूचा हिनं इन्स्टा स्टोरीवर लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. शूटिंगवेळी ती जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात नेण्यात आलं आहे. रुग्णालयातून तिनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. रुग्णालयातील बेडवर नुसरत दिसतेय. तिच्यावर उपचार सुरू आहेत. व्हिडिओ बघितला तर, नुसरतला किरकोळ दुखापत झाल्याचे दिसते. तिच्या डोळ्यांजवळ दुखापत झाली आहे.

डायरेक्टरनं धीर दिला...

दिग्दर्शक विशाल फुरिया यांनी शूटिंगवेळी जखमी झालेल्या अभिनेत्री नुसरत भरूचाला धीर दिला. नुसरतला २०२२ मध्येही दुखापत झाली होती. त्यावेळी तिच्या हाताला लागलं होतं आणि तिनं सोशल मीडियावरून चाहत्यांना ही दुःखद बातमी दिली होती.

नुसरत या वर्षी ३ चित्रपटांतून झळकणार

छोरी चित्रपटाच्या बाबतीत सांगायचं झालं तर, त्याचा पहिला भाग ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाचा पहिला भाग चाहत्यांच्या पसंतीस पडला होता. या चित्रपटासह आणखी काही चित्रपटांत ती दिसणार आहे. छोरी २ व्यतिरिक्त सेल्फी आणि अकेली या चित्रपटांमध्ये ती काम करणार आहे. २०२२ मध्ये नुसरत हिने अक्षय कुमारच्या राम सेतूमध्येही काम केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT