Hrithik Roshan: बॉलिवूडचा हँडसम आणि हंक अभिनेता हृतिक रोशन आज ४९ वर्षाचा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याने आपला जिममध्ये वर्कआउट करताना फोटो शेअर केला होता. त्याची आजही फिटनेस तरुणांना लाजवेल अशी आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या खास बॉडी शैलीने चर्चेत राहिला होती. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऋतिकच्या पहिल्या मानधनाविषयी जाणून घेऊया.
ऋतिक चित्रपटसृष्टीत अभिनय, लुक्स, कामासाठी घेत असलेल्या मेहनतीसाठीही ओळखला जातो. ऋतिक आज एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेतो पण त्याचा पहिल्या सिनेमासाठी मिळालेले मानधन ऐकून तुम्हीही अचंबित व्हाल. बालकलाकार म्हणून हृतिकने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'भगवान दास', 'आसपास', 'आप के दिवाने' सारख्या अनेक सिनेमात त्यानं काम केलं. अभिनेता हृतिक रोशननं बालकलाकार म्हणून त्याच्या सिनेकारकिर्दिला सुरूवात केली होती.
हृतिकनं वयाच्या 6व्या वर्षी पहिल्यांदा आशा पारेख यांच्या 'आशा' चित्रपटात काम केलं. यात त्याला केवळ जितेंद्रच्याच पाया पडायचं होतं. ही छोटी भूमिकाही त्यानं उत्तम रित्या वठवली आणि तिथून त्याच्या अभिनयाची दमदार कारकिर्द सुरू झाली. त्या चित्रपटात जितेंद्रच्या पाया पडण्यासाठी केवळ १०० रु. इतकं मानधन मिळालं होतं. हे मानधन त्याला त्याच्या आजोबांकडून मिळाले होते. १९८० च्या काळात १०० रु ही रक्कम फार मोठी होती.
हृतिकने पहिल्या चित्रपटातील मिळालेल्या मानधनात खेळण्यातील १० हॉट व्हिलर कार खरेदी केल्या होत्या. हृतिक तेव्हा फारच लहान असल्याने कारचं भरपूर वेड होते. तितक्या पैशात त्याने १० कार खरेदी केल्याच. हृतिकने 'भगवान दास', 'आसपास', 'आप के दिवाने' या सारख्या चित्रपटात काम केल्यानंतर तो कोणत्याही चित्रपटात दिसला नव्हता. या काळात करियरकडे लक्ष न देत शिक्षणाकडे लक्ष दिले. बऱ्याच मोठ्या काळाच्या ब्रेकनंतर त्याने दमदार पदार्पण केले.
1980 नंतर जवळपास 20 वर्षांनी 'कहोना प्यार हैं' सारख्या एका हिट चित्रपटातून त्याने फिल्म इंडस्ट्रित पदार्पण केले. या सिनेमानंतर हृतिकला पुन्हा मागे वळून पाहाण्याची कधी गरजही भासली नाही. पहिल्या कामासाठी 100 रुपये मानधन घेणारा हृतिक आज 100 करोडहून अधिक पैसे कमावत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.