Om Raut's temple farewell sparks controversy in Tirupati : नुकताच आदिपुरुष या चित्रपटाचे गाणं व ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटाची चर्चा ही सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सुरु आहे. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत प्रभास व क्रिती सेनन झळकणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक (Director) ओम राऊत यांच्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. रामायणाची कथा एका नव्या अंदाजात या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
मंगळवारी आंध्रप्रदेशातील तिरुपती मंदिराजवळ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आपल्या लाडक्या कलाकाराला राम आणि सीतेच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेषकांची प्रचंड प्रमाणात गर्दी होती. याच दरम्यान तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन त्यांनी देवदर्शनही घेतले आहे. मात्र या देवदर्शनानंतच्या एका व्हिडीओवरुन (Video) पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.
बुधवारी सकाळी संपूर्ण टीमने एकत्र जाऊन तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन घेतले. परंतु, मंदिराच्या परिसरात दिग्दर्शक ओम राऊत यांनी क्रिती सेननला निरोप देताना मिठी मारली आणि गालावर चुंबन घेतले. या गुडबाय किसवरुन पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण झाला आहे.
अशातच दिग्दर्शक ओम राऊत यांच्यावर व क्रितीच्या या व्हिडीओवर भाजपचे प्रदेश सचिव रमेश नायडू नागोथू यांनी खडेबोल सुनावले आहे. त्यांनी म्हटले की, सार्वजनिक ठिकाणी विशेषकरुन मंदिराच्या आवारात अशा पद्धतीने वागणे गरजेचे होते का ? असा सवाल त्यांनी केला आहे. मंदिराच्या समोर अशा पद्धतीने किस करणे किंवा मिठी मारणे अत्यंत चूकीचे व अपमानास्पद आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे. मात्र काही वेळानंतर त्यांनी हे ट्विट डिलिट केलं. तोपर्यंत त्यांच्या ट्विटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
16 जूनला आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट प्रेषकांच्या भेटीला येणार आहे. अशातच या नव्या वादामुळे चित्रपटावर काही पडसाद उठतील का हा देखील प्रश्न आहे. यामध्ये प्रभासने श्रीरामाची भूमिका केली आहे, क्रिती सेनॉनने जानकीची, सनी सिंहने लक्ष्मणची, सैफ अली खानने रावणाची आणि देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.