Mamta Kulkarni Get Clean Chit Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mamta Kulkarni Get Clean Chit : ममता कुलकर्णीला उच्च न्यायालयाकडून दिलासा, अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील पुराव्यांअभावी क्लीनचीट

Mamta Kulkarni News : अभिनेत्री ममता कुलकर्णीवर ड्रग्ज तस्करीचा २०१६ मध्ये आरोप करण्यात आला होता. पण आता या प्रकरणी ममता कुलकर्णी हिला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा मिळाला आहे.

Chetan Bodke

एकेकाळची बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या ममता कुलकर्णी हिच्यावर २०१६ साली ड्रग्ज केस दाखल करण्यात आला होती. अभिनेत्रीचं नाव एका अंडरवर्ल्डसोबत जोडल्यामुळे तिचं करियर संपलं होतं.

अभिनेत्रीवर ड्रग्ज तस्करीचाही २०१६ मध्ये आरोप करण्यात आला होता. पण आता या प्रकरणी ममता कुलकर्णी हिला दिलासा मिळाला आहे. अभिनेत्रीने २०१८ मध्ये गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यातील काही कागदपत्र गहाळ झाल्यामुळ तिला उच्च न्यायालयाने दिलासा दिला.

२०१६ मध्ये एनडीपीएस कायद्यानुसार अभिनेत्रीविरोधात ठाणे शहरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द व्हावा यासाठी ममताने २०१८ मध्ये, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणातील काही कागदपत्रं गहाळ झाल्यामुळे न्यायालयात अनेक वर्षे सुनावणी झाली नाही. न्यायमुर्ती भारती डांगरे आणि न्यायमुर्ती मंजुषा देशमुख यांच्या खंडपीठाने अभिनेत्री विरोधात ड्रग्ज तस्करी प्रकरणी निर्दोष सुटका केली.

पुराव्याअभावी ममता विरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करत असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. हा फौजदारी खटला होता. ती आरोपीची पत्नी आहे, म्हणून ती गुन्हेगारी ठरत नाही, असंही यावेळी न्यायालयाने सांगितले. पतीसोबत केनियाला जाण्यापूर्वी ममता बॉलिवूडमध्ये सक्रिय होती. अभिनेत्रीचा पती विकी गोस्वामी हा अंमली पदार्थाची तस्करी करणारा मास्टरमाईंड होता. नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट, १९८५ अंतर्गत नियंत्रित असलेल्या इफेड्रिनच्या निर्मिती आणि खरेदीमागील कथित सूत्रधार म्हणून होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

SCROLL FOR NEXT