Malaika Arora and Arjun Kapoor Wedding News  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Malaika Arora: अर्जुन कपूरशी लग्न करणार का? मलायकाचा उत्तर सोडून भलताच कांगावा

मलायकाने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसह लग्नचा विषय काढून प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली आहे.

Pooja Dange

Malaika Arora And Arjun Kapoor News: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने नुकतेच ओटीटीवर पदार्पण केले आहे. 'मूविंग इन विथ मलायका' हा तिचा नवीन शो 'डिस्नी प्लस हॉटस्टार' प्रदर्शित झाला आहे. शो प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरला आहे. या कार्यक्रमादरम्यान मलायकाने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसह लग्नचा विषय काढून प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली आहे. चित्रपट दिग्दर्शिका फराह खान हा शो होस्ट करत आहेत. शोमध्ये फराह, मलायकाला तिच्या खासगी जीवनापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंतचे सर्व प्रश्न विचारताना दिसत आहे.

कार्यक्रमादरम्यान फराहने मलायकाला तिच्या भविष्यातील प्लॅनविषयी विचारले. फराहने विचारले, काहीतरी फ्युचर प्लॅन असेलच ना. तुला मुलं हवी आहेत का? तुला पुन्हा लग्न करायचे आहे का? मलायका यावर लगेच उत्तर देत म्हणाली, 'मला नाही माहित माझे भविष्य कसे असेल? एक गोष्ट आहे जी खूपच काल्पनिक आहे. अशी गोष्ट, ज्यावर आपण अनेकदा चर्चा केली आहे आणि करत आहोत.' (Malaika Arora)

'जग आमच्याविषयी आणि आमच्या निर्णयाविषयी काय विचार करते, याची मला पर्वा नाही. मला असुरक्षित वाटत नाही. मी घटस्फोटित आहे किंवा मी या प्रक्रियेतून गेली आहे याचा अर्थ असा नाही की मी वाईट आहे. माझ्याकडे खूप काही आहे जे माझ्या मनाच्या जवळ आहे. मी एका नात्यात एक उत्तम व्यक्ती आहे, असे मला वाटते. मी हे काही निर्णय घेतले आहेत ते की मी आनंदी राहू इच्छितेआणि व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे, तो मला आनंदी ठेवतो.' (OTT)

अर्जुन कपूरविषयी बोलताना मलायका म्हणाली की, अर्जुन माझ्याआयुष्यातील सगळ्यात जवळचा मित्र आहे. तसेच सर्वांत मोठा समीक्षक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT