बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Senon) सध्या त्यांच्या आगामी 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Movie) या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहिद आणि क्रिती पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. दोघांच्याही चाहत्यांना या चित्रपटाबाबत खूपच उत्सुकता आहे. दोघेही सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहेत. नुकताच क्रिती सेनॉनने मुंबईतल्या प्रभादेवी येथे असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली.
क्रिती सेनॉनचा आगामी चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' 9 फेब्रुवारीला म्हणजे उद्या रिलीज होणार आहे. रिलीजच्या एक दिवस अगोदर क्रिती सेनॉन बाप्पाच्या दरबारात पोहोचली. क्रिती सेनॉन आज प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात पोहचली. सिद्धिविनायकाच्या चरणी माथा टेकून क्रितीने चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. क्रिती सेनॉनला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती.
कृती सेनॉन सिद्धिविनायक मंदिरात पोहचताच तिला पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. क्रितीने यावेळी पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यासोबत तिने या ड्रेसवर मॅचिंग फूटवेअर कॅरी केले होते. सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन बाहेर येताना क्रितीने कपाळावर टिळा लावला होता. तर मंदिर समितीकडून देण्यात आलेली पिवळ्या रंगाची शाल तिने गळ्यात घेतली होती.
क्रिती सेनॉनला मंदिराच्या आवारामध्ये पाहून तिच्या चाहत्यांनी फोटो काढण्यासाठी एकच गर्दी केली. क्रिती सेनॉनचे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेल्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटामध्ये एक अनोखी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. यामध्ये क्रिती सेनन रोबोटच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा पूर्णपणे वेगळी आहे. ज्यामध्ये माणूस आणि रोबोटमध्ये रोमान्स पाहायला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.