Merry Christmas Poster And Release Date Declared: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ कालच वाढदिवसामुळे चर्चेत होती, पण आज अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्री कतरिना कैफ आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेथुपती सध्या एका नव्या चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. चित्रपटाचे नाव ‘मेरी क्रिसमस’(Merry Christmas) असे असून सध्या चित्रपटाची सध्या चित्रपटाची तुफान चर्चा सुरू आहे.गेल्या अनेक काळापासून अभिनेत्री चित्रपटापासून दुर असून तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
श्रीराम राघवण दिग्दर्शित ‘मेरी क्रिसमस’हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ भाषेतही प्रदर्शित होणार आहे. हिंदीमध्ये या चित्रपटात प्रमुख भूमिकेत संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिनू आनंद हे सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत असून तमिळमध्ये प्रमुख भूमिकेत राधिका सरथकुमार, शनमुगराजा, केविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
रमेश तौरानी आणि जया तौरानी निर्मित ‘मेरी क्रिसमस’मध्ये संजय राउत्रे आणि केवल गर्ग यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. हा चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.