Karisma Kapoor Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Karisma Kapoor : स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कुटुंबाच्या विरोधात जाऊन करिश्माने इंडस्ट्रीत ठेवलं होतं पाऊल; पहिलाच चित्रपट ठरला सुपरहिट

Karisma Kapoor Birthday : करिश्माची फॅमिली फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. पण असं असलं तरीही तिच्या फॅमिलीची तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाऊ नये अशी इच्छा होती. फॅमिलीचा विरोध पत्करून तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले आहे.

Chetan Bodke

कपूर घराण्यातील अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून करिश्मा कपूर प्रसिद्ध आहे. तिने अभिनय आणि सौंदर्याच्या जीवावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. पण करिश्मा कपूर अनेकदा फिल्मी करियरसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. आज करिष्मा कपूरचा ५१ वा वाढदिवस आहे. अभिनेत्रीचा जन्म २५ जून १९७४ रोजी मुंबईमध्ये झालेला आहे. करिश्माची फॅमिली फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. पण असं असलं तरीही तिच्या फॅमिलीची तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाऊ नये अशी इच्छा होती. फॅमिलीचा विरोध पत्करून तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले आहे.

करिश्मा कपूरला बालपणापासूनच फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्याचे स्वप्न होते. कपूर घराण्याच्या काही रिती रिवाजानुसार मुलींना चित्रपटात काम करण्याची परवानगी नव्हती. करिश्मा ही कपूर कुटुंबातील पहिली मुलगी आहे, जिने ही परंपरा मोडून फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आणि खूप नाव कमावले. करिश्मा कपूरने १९९१ मध्ये 'प्रेम कैदी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्यासोबत चित्रपटामध्ये तिचा शाळेतला मित्र अभिनेता हरीश कुमार सहकलाकार होता. त्यांचा पहिलाच चित्रपट हिट ठरला होता. बालपणापासूनच करिश्माला अभिनयाचे बाळकडू मिळाले होते.

करिश्मा कपूरला अवघी इंडस्ट्री आणि तिचा चाहतावर्ग तिला लोलो नावानेच हाक मारतात. करिश्माला लोलो हे नाव तिच्या आईने दिले आहे. करिश्मा कपूरची आई बबिता कपूर हॉलिवूड अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा हिच्या खूप मोठ्या फॅन होत्या. त्यामुळे तिच्यापासून प्रेरित होऊन त्यांनी आपल्या मोठ्या मुलीचे नाव 'लोलो' ठेवले.

एका मुलाखतीत करिश्माने तिच्या नावाबद्दलही सांगितले आहे. "माझे नाव करिश्मा कपूर नाही. इतकी वर्षे लोक मला चुकीच्याच नावाने हाक मारत आहेत. मी लोकांच्या चुका सुधारत नाही बसत. ज्यांना ज्या नावाने मला बोलवायचं आहे, तसं बोलवू द्या. पण माझ्या नावाचं खरं उच्चारण 'करिज्मा' असं आहे. 'करिश्मा' नाही." असं तिने मुलाखतीत सांगितले होते.

करिश्मा कपूरचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते, पण ती सर्वाधिक चर्चेत राहिली ती अभिषेक बच्चनमुळे. वास्तविक, अभिषेक आणि करिश्मा कपूर ५ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, त्यानंतर त्यांची एंगेजमेंट झाली पण नंतर काही कारणास्तव त्यांचं लग्न मोडलं. काही काही काळ बच्चन आणि कपूर कुटुंबीयांचं रिलेशनही ठीक नव्हतं. यानंतर २००३ मध्ये करिश्मा कपूरने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले. दोघांना दोन मुले होती. लग्नाच्या पाच सहा वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हनिमूनला गेल्यानंतरच दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic : BKC मधील प्रवास महागणार! ५० मिनिटांत बाहेर न पडल्यास ‘कंजेशन फी’ आकारली जाणार

Mumbai: भारताच्या स्टार क्रिकेटपटूला अंडरवर्ल्डकडून धमकी, ५ कोटींच्या खंडणीची मागणी

Maharashtra Live News Update: महावितरणचे राज्यव्यापी संप सुरू

फरहानानंतर कोण बनला 'Bigg Boss 19'च्या घराचा नवा कॅप्टन?

Navapur : आश्रम शाळेतील सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू; नवापूर तालुक्यातील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT