Kalki 2898 Ad Movie : प्रभासचा ‘कल्की’ पाहायला गेले अन् वेगळाच ‘कल्की’ पाहून आले, ६ वर्ष जुना चित्रपट झाला हाऊसफुल्ल

'Kalki' Went Housefull After Prabhas Fans Mistook : अभिनेता प्रभासच्या चाहत्यांच्या एका चुकीमुळे टॉलिवूड अभिनेता डॉ. राजशेखरचा ६ वर्ष जुना चित्रपट हिट झाला आहे.
Kalki 2898 Ad Movie : प्रभासचा ‘कल्की’ पाहायला गेले अन् वेगळाच ‘कल्की’ पाहून आले, ६ वर्ष जुना चित्रपट झाला हाऊसफुल्ल
'Kalki' Went Housefull After Prabhas Fans Mistook It For His Film, 'Kalki 2898 AD'Saam Tv

‘कल्की 2898 एडी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचा लूक, पोस्टर, टीझर आणि ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची शिगेला पोहोचली आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण हे कलाकार आहेत. हा चित्रपट येत्या २७ जून २०२४ ला रिलीज होणार आहे. या चित्रपटानिमित्त एक मजेदार किस्सा घडला आहे. अभिनेता प्रभासच्या चाहत्यांच्या एका चुकीमुळे टॉलिवूड अभिनेता डॉ. राजशेखरचा ६ वर्ष जुना चित्रपट हिट झाला आहे.

Kalki 2898 Ad Movie : प्रभासचा ‘कल्की’ पाहायला गेले अन् वेगळाच ‘कल्की’ पाहून आले, ६ वर्ष जुना चित्रपट झाला हाऊसफुल्ल
Thoda Tuza Aani Thoda Maza : 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत ओमप्रकाश शिंदे आणि गार्गी फुलेंची होणार एण्ट्री; मालिकेमध्ये येणार नवा ट्वीस्ट

तेलुगू अभिनेता डॉ. राजशेखर याचा २०१९ मध्ये 'कल्कि' नावाचा चित्रपट रिलीज झाला होता. प्रभासच्या चाहत्यांनी हा प्रभासचा चित्रपट समजून त्या चित्रपटाचे तिकिट बुक केले आहे. २०१९ मध्ये डॉ. राजशेखर याचा 'कल्कि' चित्रपट रिलीज झाला होता. तर प्रभासचा येत्या २७ जूनला 'कल्की २८९८ एडी' चित्रपट रिलीज होणार आहे. हे दोन्हीही चित्रपट वेगवेगळे आहेत. प्रभासच्या फॅन्सच्या या मोठ्या चुकीमुळे त्या चित्रपटाचे तब्बल २० शोचे तिकिट्स विकले गेले आहेत.

घडलेल्या प्रकारानंतर अभिनेता डॉ. राजशेखरने एक्स पोस्ट लिहित प्रतिक्रिया दिली आहे. पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की, "त्या चित्रपटासोबत माझा कोणताही संबंध नाही. सर्व विनोद बाजूला ठेवतो. प्रभास, नागा अश्विन, सी अश्विनी दत्त, वैजयंती फिल्म्स, कलाकारांना चित्रपटाबद्दल शुभेच्छा ! ‘कल्कि 2898 एडी’ तू इतिहास रचलाय. तू चित्रपटसृष्टीत एक पाऊल पुढे टाकले." चुक 'बुक माय शो' ॲपकडून चुक झालेली आहे. अशी चर्चा प्रभासच्या चाहत्यांमध्ये होत आहे.

Kalki 2898 Ad Movie : प्रभासचा ‘कल्की’ पाहायला गेले अन् वेगळाच ‘कल्की’ पाहून आले, ६ वर्ष जुना चित्रपट झाला हाऊसफुल्ल
Munjya Collection : बजेट ३० कोटींचं, कमावले तब्बल १०० कोटी; बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या' सुसाट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com