Actress Kareena Kapoor Said Before Chandrayaan-3 Moon Landing Instagram
मनोरंजन बातम्या

Kareena Kapoor On Chandrayaan 3: चांद्रयान ३ मोहिमेचा अभिनेत्री करिना कपूरला अभिमान; हे देदीप्यमान यश तिला डोळ्यांत साठवायचंय!

Kareena Kapoor News: नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने चांद्रयान ३ बद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

Chetan Bodke

Actress Kareena Kapoor Said Before Chandrayaan 3 Moon Landing

भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्रोच्या महत्वकाक्षी चांद्रयान- 3 मोहीमेबाबत (Mission Chandrayaan 3) सतत महत्वाची अपडेट्स समोर येत आहे. भारताच्या चांद्रयान-3 मिशनचे विक्रम लँडर मॉड्यूल (LM) चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले आहे.

चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यासोबतच लँडर त्याची नवीन छायाचित्रेही घेत आहे. अशातच येत्या २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. इस्त्रोसह प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण असणार आहे. त्यामुळे सध्या भारतात चांद्रयान ३ ची बरीच चर्चा सुरू आहे. नुकतंच याविषयी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.

एका प्रमोशन दरम्यान करिनाला पत्रकारांनी चांद्रयान ३ बद्दल विचारलं. यावर अभिनेत्री म्हणते, प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. चांद्रयान 3 चे लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामसह सर्व प्लॅटफॉर्मवर लाइव्ह दाखवले जाणार आहे. आपल्याला या गोष्टीचा अभिमान वाटावा असा हा सोहळा आहे. सध्या प्रत्येक भारतीय याच्या प्रतिक्षेत आहे. मी देखील माझ्या मुलांसोबत हा क्षण पाहणार असल्याचं करीनानं प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

नुकताच इस्रोच्या प्रमुखांची खिल्ली उडवणारे प्रकाश राज स्वतःच चेष्टेचा विषय ठरले होते. त्यांची ती पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केले आहे. प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटरवर इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचे एक व्यंगचित्र शेअर केले आहे, ज्यामध्ये ते शर्ट आणि लुंगी घालून चहा ओतताना दिसत आहेत. हे व्यंगचित्र शेअर करत प्रकाश राज यांनी 'ब्रेकिंग न्यूज!' लिहित पोस्ट शेअर केली आहे. पुढे फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, विक्रमलँडरने चंद्रावरून पहिले छायाचित्र पाठवले आहे. हा फोटो शेअर करताच अभिनेता प्रचंड ट्रोल झाला आहे. (Trolled)

भारताची चांद्रयान 3 मोहिम इतिहास रचण्यापासून अगदी काही पावले दूर आहे. चांद्रयानचे विक्रम लँडर चंद्राला प्रदक्षिणा घालण्यासोबत त्याने काही छायाचित्रही शेअर केले आहेत. विक्रम लँडर मॉड्युल येत्या बुधवारी अर्थात 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची शक्यता आहे. चांद्रयान 3 चं चंद्रावरील लाईव्ह लँडिंग पाहण्यासाठी भारतीय खूपच उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत सामिल होणार? मनसेसाठी शरद पवार आग्रही?

Maharashtra Live News Update: ओंकार हत्तीवर फटाके फेकल्याचा व्हिडिओ, वनविभागाकडून खुलासा

Radhakrishna Vikhe Patil: विखेंचं शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ! कर्जमाफीवरून वादग्रस्त विधानानं पेटला वाद

Crime News : संतापजनक! क्लासवरून घरी येताना वाटेत गाठलं, ६ वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार, नांदेड हादरलं

SCROLL FOR NEXT