Subhedar Movie New Record: प्रदर्शनाआधीच 'सुभेदार'ची सोशल मीडियावर चर्चा, रिलीजआधीच रोवला मानाचा तुरा

Subhedar Movie: चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून चित्रपटाने प्रदर्शनाआधीच एक नवीन रेकॉर्ड केलाय.
Subhedar Movie New Record
Subhedar Movie New RecordInstagram

Subhedar Movie New Record

राजा शिवछत्रपतींच्या चित्रपटातील अष्टकांमध्ये आतापर्यंत चार चित्रपुष्प प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराजच्या घवघवीत यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला पाचवे पुष्प भेटीला येणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपट येत्या २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. नुकतंच चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून चित्रपटाने प्रदर्शनाआधीच एक नवीन रेकॉर्ड केलाय.

Subhedar Movie New Record
Kiran Mane: '...म्हणून ती हजारो अनाथांची माय होऊच शकली'; किरण मानेची बापाच्या हळव्या मनाला साद घालणारी पोस्ट चर्चेत

गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाची तुफान चर्चा सुरू आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अनेकदा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली होती. अखेर हा चित्रपट येत्या २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. नुकतंच चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरू झाली असून चित्रपटाला थिएटरमध्ये जास्त प्राईम- टाईम उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. जरी असं असलं तरी, प्रदर्शनाआधीच बुक माय शो वर 40K+ इंटरेस्टेड लाईक्स मिळालेला पहिला मराठी चित्रपट 'सुभेदार' पहिला मराठी चित्रपट ठरलाय.

सुभेदार चित्रपटाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. निर्मात्यांनी पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, "तुमच्या प्रेमामुळे 'सुभेदार' चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ! प्रदर्शनाआधीच Book My Show वर 40K+ इंटरेस्टेड लाईक्स मिळालेला पहिला मराठी चित्रपट 'सुभेदार' !" सध्या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र असून रविवारी चित्रपटाची टीम रविवारी सकाळी मरीन्स ड्राईव्हवर प्रमोशनसाठी गेले होते. त्यावेळी चित्रपटाच्या टीमला भेटण्यासाठी असंख्य फॅन्सनी गर्दी केली होती.

Subhedar Movie New Record
Ghoomer Special Screening: अभिषेक बच्चनने दिव्यांग मुलांसोबत साजरा केला 'घूमर'; अभिनेत्याला पाहून चिमुकलेही भारावले

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक मा.राजदत्त, दिग्पाल लांजेकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अजिंक्य ननावरे, रिषी सक्सेना, नूपुर दैठणकर, अर्णव पेंढारकर आदि मराठीतील दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत. (Celebrity)


चित्रपटातील ‘मावळं जागं झालं रं’, ‘आले मराठे’, ‘हळद लागली रायबाला’ ही तीनही गाणी सध्या तुफान गाजतायेत. देवदत्त बाजी, अवधूत गांधी, सुवर्णा राठोड, रोहित राऊत, निधी हेगडे यांच्या स्वरांनी या चित्रपटातील गाणी सजली असून संगीतकार देवदत्त बाजी यांचे संगीत गाण्यांना लाभले आहे. (Song)

Subhedar Movie New Record
Prakash Raj's On Chandrayaan-3: प्रकाश राज यांनी 'चांद्रयान 3'ची उडवली खिल्ली; संपतापलेल्या नेटकऱ्यांनी अभिनेत्याला चांगलेच सुनावले

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com