Kangana Ranaut Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: श्रद्धाचे शेवटचे पत्र वाचून कंगना भावूक, व्यक्त केल्या आपल्या भावना

2020 मध्ये श्रद्धाने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्यावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kangana Ranaut: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. पोलीस तपासात आता श्रद्धा हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. 2020 मध्ये श्रद्धाने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्यावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने संताप व्यक्त केला आहे. श्रद्धाचे पत्र वाचून कंगनाने भावूक पोस्ट लिहिली आहे. तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, "हे ते पत्र आहे जे 2020 मध्ये श्रद्धाने पोलिसांना मदतीची विनंती करण्यासाठी लिहिले होते. तिने सांगितले होते की, आफताब नेहमी तिला घाबरवायचा आणि तिचे तुकडे करण्याची धमकी द्यायचा.

तो तिला ब्लॅकमेल करण्याचा देखील प्रयत्न करत होता. सोबतच अफताब श्रद्धाला मारहाणही करायचा. एवढे सगळे करूनही त्याने श्रद्धाचे मतपरिवर्तन कसे केले आणि आपल्यासोबत श्रद्धाला दिल्लीला कसे नेले हे अद्यापही समजू शकलेले नाही."

Kangana Post

कंगना पुढे म्हणते 'आपल्या सर्वांना माहित आहे की अफताबने श्रद्धासोबत 'लग्नाचे वचन' देत हे कृत्य केले होते. ती कमजोर नसून ती एक मुलगी होती. जिचा जन्म या जगात राहण्यासाठी झाला होता.

पण, दुर्दैवाने ती स्त्री होती आणि तिच्याकडे स्त्रीचे हृदय होते. महिलेचा मूळ स्वभाव हा काळजी घेणे आणि रक्षण करणे हा आहे. स्त्रिया पृथ्वीसारख्या असतात, महिला कधीच कोणाचाही भेदभाव नाही. तिच्याकडे सर्वांना सामावून घेण्याची आपूलकीची भावना असते.

कंगनाने पुढे लिहिले आहे की, 'ती एक अशी मुलगी होती जिचा परीकथांवर विश्वास होता. तिला विश्वास होता की जगाला तिच्या प्रेमाची गरज आहे. ती अजिबात कमकुवत नव्हती, ती एक परीकथेत राहणारी मुलगी होती.

ती तिच्या दुनियेत जगताना नायकाच्या आतल्या राक्षसाशी लढण्याचा प्रयत्न करत होती. आपल्या सर्वांना माहित आहे की प्रेम आपल्याला व्यापून टाकते. परंतु शेवटपर्यंत तिचे प्रेम जिंकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT