Kangana Ranaut New Home
Kangana Ranaut New Home Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: कंगनाचा नेमका टोला कोणाला?, ‘अतिक्रमण करणाऱ्यांना गोळ्या घातल्या जातील’ म्हणत लावली घराबाहेर पाटी

Chetan Bodke

Kangana Ranaut New Home: बॉलिवूडची पंगा गर्ल अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच चर्चेच्या अग्रस्थानी असते. भल्याभल्यांना आपल्या उरमट भाषेमध्ये बोलत सर्वांचीच बोलती बंद करते. ट्रेंडिंग विषयावर आपली प्रतिक्रिया देत स्वत:ला प्रकाशझोतात ठेवण्याचं चोख पुर्ण करते. पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली तिच्या घरामुळे. कंगनाने मुंबईत स्वतःचं नवीन घर विकत घेतलंय. या घराबाहेर कंगनाने एक पाटी लावली आहे. त्यामुळे कंगना विषयी चर्चेचा आणि वादाचा नवीन मुद्दा उपस्थित झालाय.

कंगनाचं मुंबईत आणि मनालीमध्ये अनेक मोठ-मोठी घरं आहेत. कंगनाने नुकतंच तिच्या मुंबईतील घराबद्दल एक व्हिडिओ शेयर केलाय. तिच्या नव्या घराबाहेर एक जबरदस्त पाटी लिहिली आहे, त्यामुळे सध्या ती सर्वत्र चर्चेचा विषय ठरली. ती पाटी म्हणजे.. "कोणतंही अतिक्रमण नाही. अतिक्रमण करणाऱ्यांना गोळ्या घातल्या जातील. आणि यातून बचावलेल्या माणसांना पुन्हा गोळ्या घातल्या जातील," असं या पाटीत लिहिले आहे.

या पाटीमुळे कंगना रणौतच्या घरात कोणीही अनोळखी माणूस प्रवेश करण्यासाठी नक्कीच शंभर वेळा विचार करेल.

Kangana Ranaut New Home At Mumbai

व्हिडीओ शेअर करत कंगना म्हणते, “माझ्याकडे माझ्या सर्व घरांचं सुशोभिकरण (Decoration) करण्याचं एक व्हिजन ठरलं आहे, पण मला कधीच तशी संधी मिळाली नाही. पण आता मी माझ्या मनाप्रमाणे माझे घर डेकोरेट करत आहे. माझं मन डोंगराळ भागात अर्थात गावी जास्त रमतं. मला सर्वात जास्त दक्षिण भारत फार आवडतो. त्यामुळे मी माझ्या घरात तंजोरचा फोटो लावला आहे.”

या कंगनाच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत अनेक तंजोरची डिझाईन असलेले फोटो लावण्यात आले असून तिरुपती बालाजीचा ही तिने फोटो लावला आहे.

कंगना गेल्या काही दिवसांपुर्वीच पुन्हा एकदा ट्वीटरवर परत आली आहे. तिचं ट्वीटर अकाऊंट ट्वीटरने बंद केले होते, ते जुने अकाऊंट पुन्हा सुरु करुन दिल्यानंतर तिचे ट्वीटरवरील टीव टीव पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: बारामतीत अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

Weight Loss Mistakes : एक्सरसाइज अन् व्यायाम करूनही वजन काही कमी होईना? मग जाणून घ्या जाड होण्यामागचं कारण

Sangli Loksabha News: सांगलीचा 'भावी खासदार' कोण? बुलेट, युनिकॉर्नची पैज आली अंगलट; दोघांवर गुन्हा दाखल

ATM Crime : चोरट्यांनी एटीएम मशीनच लांबविली; चोरट्यांनी अगोदर फोडला सीसीटीव्ही

Health Tips: मसाल्यामधील धणे जीरे खाण्याचे आश्चर्यचकित करणारे फायदे

SCROLL FOR NEXT