Kangana Ranaut On Work Culture Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut : "भारतीयांनी आळशी होऊ नये, कारण...", वर्क कल्चर आणि विकेंडबद्दल कंगना रणौत यांचं भाष्य

Kangana Ranaut On Work Culture : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत यांनी वर्क कल्चरवर भाष्य केलं आहे. अभिनेत्रीचा हा सामाजिक संदेश कमालीचा चर्चेत आला आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत यांची मंडी लोकसभेतून खासदार म्हणून निवड झालेली आहे. अभिनेत्रीची खासदार म्हणून निवड झाल्यानंतर कमालीची चर्चेत आली आहे. नुकतंच अभिनेत्रीने वर्क कल्चरवर भाष्य केलं आहे. अभिनेत्रीचा हा सामाजिक संदेश कमालीचा चर्चेत आला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने आपल्या इन्स्टा स्टोरीवर पंतप्रधान मोदी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये कंगना म्हणते, "स्वत:ला कामामध्ये व्यस्त ठेवण्याच्या प्रवृत्तीला सामान्य करण्याच्या गरजेवर भर द्यायला पाहिजे. भारतीयांनी कामात आळशी होऊ नये. कारण भारत अजून विकसित देश झालेला नाही." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील पीएमओमधील कर्मचाऱ्यांना संबोधन करतानाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधानांनी भारतीयांच्या कामाच्या पद्धतीवर भाष्य केले आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने आपले मत व्यक्त केले आहे.

Kangana Ranaut On Work Culture

कंगना रणौतने इन्स्टा स्टोरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये पंतप्रधान राष्ट्र उभारणीसाठी 24x7 काम करण्याविषयी बोलत आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना कंगना रणौतने वर्क कल्चरवर आपले मत मांडले, "आम्हाला कामामध्ये आवड असणाऱ्या लोकांची गरज आहे. विकेंडची वाट पाहणे आणि सोमवारी मीम्सच्या माध्यमातून कामाची तक्रार करणं थांबवलं पाहिजे. वेस्टर्न कल्चरमुळे अनेक लोकं आळशी झालेले आहेत. भारत देश अजून विकसित राष्ट्र नाही. आपण कामामध्ये आळशी होऊन चालणार नाही." असं कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udgir Fort History: मध्ययुगीन युद्धभूमी आणि भव्य संरचना, उदगीर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Solapur : सोयाबीनच्या बीलापोटी मिळालेला चेक बँकेत भरल्यानंतर चोरीला; दुसऱ्याच खात्यावर वटला ४ लाखाचा चेक

Sshura Khan : खान कुटुंबाची सून शूरा आहे तरी कोण? वाचा Unknown Facts

Pune Traffic Protest : चाकणपेक्षा गुजरात बरा! वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उद्योजक रस्त्यावर उतरले

Maharashtra Live News Update: पुण्यात भाजप आणि शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT