Kangana Ranaut Upcoming Movie Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: कंगनाचे 'पठान'प्रेम नेटकऱ्यांना खटकलं, अभिनेत्री पुन्हा ठरली टीकेची बळी

कंगनाने 'पठान' चित्रपटाची केलेली स्तुती लोकांना पटली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kangana Ranaut On Pathan: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडच्या तुम्ही 'खान'वर तिने टीका केली आहे. परंतु आता तिचा सूर बलायल्याचे पाहायला मिळाला. नेहमी टीका करून चायचेत असणाऱ्या कंगनाने शाहरुखच्या 'पठान' चित्रपटाचे कौतुक केले आहे.

नुकतेच कंगना रनौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. दरम्यान चित्रपटाच्या रॅप-अप पार्टीत शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाचे कौतुक केले आहे. या पार्टीत कंगनासोबत अनुपम खेरही उपस्थित होते.

जेव्हा 'पठान' चित्रपटाविषयी कंगना रनौतला विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, “सुदैवाने आमच्यासाठी हा चित्रपट चांगला चालला आहे. असे चित्रपट चालले पाहिजेत.' या कार्यक्रमाला कंगना व्यतिरिक्त अनुपम खेर देखील उपस्थित होते. अनुपम खेर यांनी 'पठान' सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हटले आणि हा खूप मोठा चित्रपट असल्याचे सांगितले. त्याचबरोबर हृतिक रोशन, विद्युत जामवाल, राजकुमार रावची पत्नी पत्रलेखा देखील शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाचे कौतुक करताना दिसले.

कंगनाने 'पठान' चित्रपटाची केलेली स्तुती लोकांना पटली नाही. कंगना इतकी कशी बदलली, यावर लोकांना विश्वास बसत नाहीये. कंगनाच्या या वक्तव्यावर नेटकरी कमेंट करत आहेत. कंगना पुन्हा एकदा ट्विटरवर परतली आहे. ट्विटरवर येताच तिने पुन्हा एकदा बॉलिवूडला लक्ष्य केले आहे. पठानच्या रिलीजच्या दिवशी कंगनाने ट्विट करून म्हटले की, 'चित्रपटाचे यश नेहमी आकड्यांच्या आधारावर मोजले जाते, गुणवत्तेवर नाही'.

कंगनाने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, फिल्म इंडस्ट्री एवढी मूर्ख आहे की जेव्हा जेव्हा त्याला यशाचे दाखवायचे असते तेव्हा आपल्या क्रिएटिव्हिटीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ते नेहमी तुमच्या चेहऱ्यावर अंकांची चमक दिसते. चित्रपटसृष्टीचा दर्जा किती घसरला आहे, हे यावरून स्पष्ट होते. कंगनाने या ट्विटमध्ये कोणाचेही नाव घेतले नसले तरी पठानवर निशाणा साधला जात आहे.

'पठानविषयी बोलायचे झाले तर शाहरुख खानच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी उत्कृष्ट कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 52 कोटींहून अधिक कमाई केली आहे. शाहरुख खानचे चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

SCROLL FOR NEXT