Kajol Devgan Skin Tone Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kajol Devgan: रंगावरुन ट्रोल करणाऱ्यांना काजोलने मारली चपराक, 'त्या सर्वांसाठी जे मला विचारतात की...'

त्वचेच्या रंगावरून ट्रोल करणाऱ्यांना काजोलने सडेतोड उत्तर दिलं आहे.

Chetan Bodke

Kajol Devgan Trolled: बॉलिवूडमधील अनेक बड्या अभिनेत्रींना आजही अनेकदा त्यांच्या त्वचेच्या रंगावरून ट्रोल केले जाते. तर कधी त्यांच्या कपड्यावरूनही. तसाच ट्रोलिंगचा सामना सध्या बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगण हिला करावा लागत आहे. आता त्वचेच्या रंगावरून ट्रोल करणाऱ्यांना काजोलने सडेतोड उत्तर दिलं आहे. अशा ट्रोलिंगला ती स्वतः अजिबात गांभीर्याने घेत नसल्याचंही म्हटलं.

काजोल नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती फारशी सध्या चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने ट्रोलिंग ही सोशल मीडियावरील सर्वात विचित्र गोष्ट असल्याचं बोलली होती. तिला नेहमीच तिच्या त्वचेच्या रंगावरून ट्रोल केलं जातं. अनेकदा तिला त्वचेचा रंग उजळण्यासाठी कोणती ट्रीटमेंट केली आहे? असा प्रश्न नेहमीच विचारला जातो.

यापूर्वीच्या मुलाखतीत काजोलने गोरं होण्यासाठी कोणतीही ट्रीटमेंट घेतली नसल्याचं आणि त्वचेचा सावळा रंग हा टॅनिंगमुळे असल्याचं सांगितलं होतं. पण आता तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत ट्रोलर्सना उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे. नुकतेच काजोलने शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये तिचा हटके लूक दाखवला आहे. त्यामुळे सध्या तिची बरीच चर्चा होत आहे.

“त्या सर्वांसाठी जे मला विचारतात की मी एवढी गोरी कशी काय झाले.” अशी टॅगलाईन देत तिने पोस्ट शेअर केली आहे.

काजोलने शेअर केलेल्या पोस्टमध्ये स्वतःचा चेहरा एका मास्कने पूर्णपणे झाकून घेतला आहे. अशा अवतारात तिला ओळखणे देखील कठीण आहे. ऊन्हापासून बचाव करण्यासाठी तिने काळ्या रंगाचा गॉगल देखील घातला आहे. हा फोटो शेअर करत काजोलने तिच्या त्वचेच्या रंगावरून ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.

एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत काजोल म्हणते, “मी कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट घेतलेली नाही. फक्त आता मी ऊन्हापासून दूर राहते. माझ्या करिअरमधील १० वर्ष मी सातत्याने ऊन्हात काम करत होते. त्यामुळे माझी त्वचा टॅन झाली होती. आता मी ऊन्हात काम करणं बंद केलं आहे. त्यामुळे टॅनिंग अजिबात होत नाही. ही कोणतीही शस्त्रक्रिया नाही तर घरी राहण्याची कमाल आहे.”

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'सलाम वेंकी' चित्रपटातून काजोल प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पण हा चित्रपट तिचा जबरदस्त फ्लॉप ठरला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT