Jaya Prada's Controversial Married Life  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jaya Prada Tragic Love Story: जया प्रदा यांचे वैवाहिक जीवन; लग्न होऊनही राहतात एकट्या, कारण...

Jaya Prada Birthday: बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा आणि बॉलिवूड चित्रपट निर्माते श्रीकांत नाहटा यांनी २२ जून १९८६ रोजी लग्नगाठ बांधली.

Chetan Bodke

Jaya Prada's Controversial Married Life: ८० आणि ९० च्या दशकात जन्मलेल्या हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री जय प्रदा यांचा आज वाढदिवस. जय जप्रदा एक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबतच एक राजकारणी म्हणून सर्वश्रृत होत्या. भलेही राजकारणात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला असला तरी, त्यांचे खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. जया प्रदा यांनी बराच काळ हिंदी सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयामुळे राज्य केले.

३ एप्रिल १९६२ रोजी जन्मलेल्या जया प्रदा यांचं खरं नाव ललिता राणी. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी त्यांनी स्वतःचं नाव बदलून जया प्रदा असं ठेवलं. अभिनय क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी राजकारणात एंट्री करत राजकारणातही स्वतःचे वेगळेच स्थान निर्माण केले. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी अभिनयक्षेत्रात पाऊल टाकत प्रोफेशनल लाईफमध्ये त्या एक यशस्वी महिला म्हणून चर्चेत राहिल्या. जया प्रदा यांना खासगी आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.

जया प्रदा यांनी आपल्या सिने कारकिर्दित २०० हून अधिक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा डंका सर्वत्र वाजवला. जया प्रदा त्या दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी ७० आणि ८० च्या दशकातील काही सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली. जया यांच्या करिअरची सुरुवात तेलुगू चित्रपटातून झाली, पण त्यांना ओळख फक्त बॉलिवूडमधूनच मिळाली.

जया यांचे बॉलिवूड चित्रपट निर्माते श्रीकांत नाहटा यांच्यासोबत नाव जोडले गेले. पण तरी देखील त्यांनी त्या नात्याला मैत्रीचेच नाव दिले होते. २२ जून १९८६ रोजी त्यांनी श्रीकांत नाहटासोबत लग्नगाठ बांधली. त्यावेळी नाहटा विवाहित होते आणि त्यांना तीन मुलं होते.

एका वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, जयासोबत लग्न केल्यानंतर नाहटा यांनी आपल्या पहिल्या पत्नीला सोडले नाही. याशिवाय त्यांनी जयाला आई होण्याचा आनंदही दिला नाही.

त्यामुळे त्यांच्या नात्यात कटुता येऊ लागली आणि हळूहळू दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. यानंतर जया आपल्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेऊन आता त्याच्यासोबत राहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वेण्णालेक येथे अडकलेली बोट बाहेर काढण्यात आली, पर्यटकांनी सोडला सुटकेचा निश्वास

Shocking: नवऱ्याचं दुसऱ्या महिलेसोबत लफडं; बायकोने घडवली कायमची अद्दल, गुप्तांगावर फेकलं उकळतं पाणी अन् अ‍ॅसिड

Thamma Collection : 'थामा'ची बंपर ओपनिंग; पहिल्याच दिवशी 'सैयारा'ला पछाडलं, रश्मिका-आयुष्मानची जोडी सुपरहिट

Prajakta Mali Family Photo: अभिनेत्री प्राजक्ता माळीने कुटुंबासोबत साजरी केली दिवाळी, लक्ष्मीपूजनाचे खास फोटो शेअर

Actor Death: प्रसिद्ध अभिनेता अन् गायकाचे हार्ट अटॅकने निधन, शेवटची पोस्ट चर्चेत

SCROLL FOR NEXT