Karan Johar Image  Saam Tv
मनोरंजन बातम्या

करण जोहरला अभिनेत्रीनं रोखठोक शब्दांत सुनावले होते, 'तो' किस्सा अद्याप विसरला नाही!

एकदा करण जोहरच्या होस्टिंगवरून बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांनी टीका केली होती. ही टीका करण जोहर कधीही विसरू शकत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता करण जोहर (Karan Johar) अनेकदा अवॉर्ड शो होस्ट करताना दिसतो. चाहते आणि सेलिब्रिटी चित्रपट निर्माता करण जोहरच्या होस्टिंग कौशल्याचं नेहमीच कौतुक करत असतात. पण एकदा त्याच्या होस्टिंगवर बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी टीका केली होती. ही टीका करण जोहर कधीही विसरू शकत नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने हा किस्सा सांगितला आहे.

करण जोहर त्याच्या सेलिब्रिटी चॅट शो 'कॉफी विथ करण'साठी प्रसिद्ध आहे. हा शो ७ जुलैपासून प्रदर्शित होणार आहे. डिस्ने प्लस हॉट स्टारवरील 'कॉफी विथ करण'च्या सातव्या सीझनची आज करण जोहर सुरुवात करणार आहे. करणच्या या प्रसिद्ध चॅट शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग त्यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी येणार आहेत.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, करण जोहरने त्याच्या होस्टिंग कौशल्याबद्दल झालेल्या सर्वात वाईट टीकेबद्दल सांगितले. करण जोहर म्हणाला की, 'मी जेव्हा स्टेजवर असतो तेव्हा माईक असला तरीही मी खूप जोरात बोलतो, असे जया बच्चन मला एकदा म्हणाल्या होत्या. त्यांनी मला विचारलं होतं की, करण तू माईकवर का ओरडतोस? मला नेहमी असं वाटायचं की मी उत्साही दिसत आहे. परंतु त्या मला म्हणाल्या की तुझ्याकडे माइक आहे म्हणूनच तुला बोलत असताना ओरडण्याची गरज नाही.

'कॉफी विथ करण'बद्दल बोलताना करण जोहर म्हणाला की, 'सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये या शोबाबत बरेच वादही झाले आहेत. एक काळ असा होता की सोशल मीडियावर बॉलिवूडबद्दल खूप द्वेष वाढला होता. अशा वेळी 'कॉफी विथ करण' या शोला टार्गेट करण्यात आले. पण मला माहीत होतं की हे ट्रोलिंग काही काळच असेल. म्हणूनच तर, डिस्ने प्लस हॉट स्टारला हा शो पुढे न्यायचा आहे. कलाकारांना या शोमध्ये यायचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एवढी ट्रोलिंग होऊनही मला हा शो यापुढेही करायचा आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT