Jaya Bachchan on sacrificing her career: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री जया बच्चन अनेकदा चर्चेत असते. कधी त्यांच्या स्वभावामुळे तर आधी त्यांच्या वक्तव्यांमुळे जया सर्वांचे लक्ष वेधून घेतात. जया बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पण यावेळी कारण थोड वेगळे आहे. जया बच्चन यांनी अलीकडेच त्यांच्या चित्रपटांमधून ब्रेक घेण्याच्या निर्णयाला 'त्याग' म्हणून नाव देणाऱ्यांबद्दल नाराजी दर्शवली आहे.
अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केल्यानंतर आणि मुले झाल्यानंतर जया बच्चन यांनी काही काळ चित्रपटांपासून दूर होत्या. लोक याला कुटुंबासाठी केलेला त्याग म्हणतात. मात्र, जया बच्चन यांना हे मान्य नाही. अलीकडेच जया नात नव्या हिच्या पॉडकास्टमध्ये यावर अगदी मनमोकळेपणाने बोलल्या आहेत.
जया बच्चन 'व्हॉट द हेल नव्या' या पॉडकास्टच्या फिनाले एपिसोडमध्ये नात नव्या नवेली नंदासोबत संवाद साधताना दिसल्या. या पॉडकास्टमध्ये त्यांनी अनेक गमतीशीर गोष्टी केल्या. या पॉडकास्टमध्ये यांनी चित्रपटांमधून ब्रेक घेण्याच्या जया यांच्या निर्णयावरही चर्चा केली. जया यांनी सांगितले की, त्यांनी व्यावसायिक जीवनातून ब्रेक घेतला कारण त्यांना नवरा आणि मुलांसोबत वेळ घालवायचा होता.
पॉडकास्टमध्ये जया बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा उपस्थित होत्या. यादरम्यान जया बच्चन म्हणाल्या की, मला 'त्याग' हा शब्द अजिबात आवडत नाही. जेव्हा स्त्रियांनी त्यांच्या कुटुंबासाठी काही करतात त्याचे वर्णन करण्यासाठी त्याग या शब्दाचा वापर केला जातो. जया बच्चन यांच्या या चर्चेवर नव्याने म्हणाली की, महिला इतरांसाठी आपल्या सुखाचा त्याग करतात. याला उत्तर देताना जया म्हणाल्या, 'तुम्ही दुसऱ्याचे विचार, भावना आणि गरजा पुढे करत आहात. जेव्हा तुम्ही मनापासून काही करता तेव्हा तो त्याग नसते. मी चित्रपटांमधून ब्रेक घेतला तेव्हाही हा त्याग नव्हता.' (Celebrity)
पॉडकास्टमध्ये जया बच्चन म्हणाल्या, 'मला आठवतं, जेव्हा मी काम करणं बंद केलं, तेव्हा माझ्या आजूबाजूचे सर्वजण म्हणाले, 'तिने तिच्या लग्नासाठी आणि मुलांसाठी करिअरचा त्याग केला.' पण, तसे नव्हते. आई आणि पत्नी म्हणून मला खूप आनंद झाला. मला जे काही करायला मिळालं त्यापेक्षा मला ती भूमिका जास्त आवडली. कुटुंबाला वेळ देणे हा त्याग मुळीच नव्हता.'
जया बच्चन यांनी 1971 मध्ये 'गुड्डी' चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. 1981 मध्ये आलेल्या 'सिलसिला' चित्रपटानंतर जया बच्चन यांनी चित्रपटांमधून ब्रेक घेतला. त्यानंतर त्याने 2000 साली हृतिक रोशन स्टारर 'फिजा' या चित्रपटातून चित्रपटांमध्ये पुनरागमन केले. (Movie)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.