jacqueline fernandez
jacqueline fernandez  saam Tv
मनोरंजन बातम्या

Jacqueline Fernandez: जॅकलिन 'फेऱ्यात' अडकली, काय झालं आजच्या सुनावणीत?

Chetan Bodke

Jacqueline Fernandez: सुकेश चंद्रशेखरच्या कोट्यावधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात सहआरोपी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस विरुद्ध आरोप सिद्ध करण्याबाबत दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात आज अर्थात 12 डिसेंबर रोजी सुनावणी झाली. जॅकलिनसोबत तिचे वकील प्रशांत पाटील आणि शक्ती पांडे हे एकत्र सकाळी दहाच्या सुमारास न्यायालयात पोहोचले. ईडीच्या तपासात अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे सकाळी 11 वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात करण्यात आली होती.

जॅकलिनच्या वकिलाने कोर्टात आपला युक्तिवाद सादर केला होता. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात आज या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्यात आली. कोर्टात या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 डिसेंबरला घेण्यात येणार आहे. आरोपींची फसवणूक करण्याची पद्धत आणि त्यांच्या कामाची पद्धत पाहायला हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी आज न्यायालयात केला.

देशातील सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या कार्यालयांच्या नावाने तो संपर्क करायचा असे ईडीने सांगितले. सोबतच याबाबत ईडीने असाही खुलासा केला की, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे असे आम्ही म्हणू शकत नाही. या प्रकरणात अतिरिक्त आरोपपत्र देखील दाखल केले जाऊ शकते.

या प्रकरणाची शेवटची सुनावणी गेल्या महिन्यात २४ नोव्हेंबर रोजी झाली होती. ज्यामध्ये जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांनी काही मुद्द्यांवर युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितल्याचे म्हटले होते. तक्रारदाराची मागणी मान्य करून न्यायालयाने पुढील तारीख १२ डिसेंबर दिली.यापूर्वी जॅकलिन फर्नांडिसला १५ नोव्हेंबरला जामीन मंजूर झाला होता.

जामीन मंजूर करताना न्यायालयाने सांगितले होते की, तपासादरम्यान आरोपीला अटक करण्यात आली नव्हती. त्यामुळे जामीन दिला जाऊ शकतो. त्याला विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी 2 लाखांच्या दंडासह जामिन मंजूर केला आहे. त्याच्या अटींमध्ये न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय देश सोडू नये आणि ईडीने तपासासाठी बोलवल्यानंतर तपासात पुर्णपणे मदत करावी.

ठग सुकेश चंद्रशेखरचे नाव २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जोडले गेल्याने जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. जेव्हापासून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्रात जॅकलिनला आरोपी बनवले आहे, तेव्हापासून तिच्या अटकेची मागणी जोर धरू लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: घरात मनी प्लांट लावताना या चुका टाळा; अन्यथा प्रगती थांबेल

Today's Marathi News Live: ४ जूननंतर अच्छे दिनाची सुरुवात होईल - उद्धव ठाकरे

Khadakwasla Dam Water Level: पुणेकरांना दिलासा, पाणीकपातीचे संकट टळलं; जाणून घ्या खडकवासला धरण साखळी पाणीसाठ्याची स्थिती

Chardham Yatra Bus Accident | बुलढाण्यातून चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या बसला भीषण आग

Soami Bagh Mausoleum : सेम टू सेम ताजमहालच! बांधकामाला १०० हून अधिक वर्षांचा काळ; पर्यटकांचं ठरतंय आकर्षण

SCROLL FOR NEXT