Sania Mirza: चर्चा तर होणारच! 'द मिर्झा मलिक टॉक शो'चा टीझर अन् घटस्फोटाची रंगली चर्चा

टेनिसपटू सानिया मिर्झा आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बरीच रंगत होती.
Shoaib Malik Wishes Sania Mirza On Her Birthday
Shoaib Malik Wishes Sania Mirza On Her BirthdaySaam TV

Sania Mirza: टेनिसपटू सानिया मिर्झा आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बरीच रंगत होती. सानिया आणि शोएब या दोघांनीही जवळपास 12 वर्षे एकत्र संसार केला. सध्या मिळालेल्या माहितीनुसार ते दोघेही वेगळे राहत असल्याची चर्चा होत आहे. आता या दोघांच्याही घटस्फोटाच्या चर्चा नक्की अफवा आहेत की दुसरं काय हे अद्याप ही अस्पष्टच आहे.

Shoaib Malik Wishes Sania Mirza On Her Birthday
Umesh Kamat Birthday Special: प्रिया बापटने नवऱ्याला दिले गोड 'सरप्राईज', 'माय लाईफ' म्हणत उमेश कामतची केली स्तुती

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने अलीकडेच त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा असल्याची माहिती एका इंग्रजी संकेतस्थळाला दिली होती, त्यावेळी शोएब म्हणाला, “ही आमची वैयक्तिक बाब आहे. या प्रश्नाचे उत्तर मी किंवा माझी पत्नी देणार ​​नाही." दोघेही घटस्फोटाच्या चर्चेमुळे सोशल मीडियावर बरेच चर्चेत आले होते. ते दोघेही विभक्त राहत असल्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर बऱ्याच जणांनी त्यांना ट्रोल केले होते.

Shoaib Malik Wishes Sania Mirza On Her Birthday
Besharam Rang: शाहरूख-दीपिकाचे 'बेशरम रंग' गाणं इतकं का व्हायरल होतंय? 4 तासांत केली 'ही' कमाल

सध्या घटस्फोटाच्या चर्चा होत असताना शोएब मलिकच्या इंस्टाग्राम बायोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या सध्याची पोस्ट असे दाखवत आहे की, त्यांच्या नात्यात काही तरी दुरावा निर्माण करत आहे.शोएबने त्याच्या इन्स्टा बायोमध्ये लिहिले आहे की, “अॅथलीट, हसबंड टू अ सुपरवुमन सानिया मिर्झा, फादर टू वन ट्रु ब्लेसिंग,” हे दोघेही एप्रिल २०१० मध्ये लग्नबंधनात अडकले होते. या जोडीला नेटकऱ्यांकडून अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

शनिवारी, शोएब मलिकने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर सानिया मिर्झासोबत एक व्हिडिओ पोस्ट केला तेव्हापासून पुन्हा एकदा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सुरुवात झाली होती. त्याच्या आणि सानियाच्या घटस्फोटाच्या अफवांना “वैयक्तिक बाब” असे संबोधून त्याने मौन तोडल्यानंतर शोएबची पोस्ट चर्चेत आली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत, त्यांनी आपल्या वैयक्तिक बाबी जास्त सोशल मीडियावर शेअर केल्या नाहीत. त्यांच्या या निर्णयाचे बऱ्याच चाहत्यांनी स्वागत केले आहे.

Instagram
InstagramInstagram

शोएबने त्यांचा आगामी टॉक शो 'द मिर्झा मलिक टॉक शो'चा एक नवीन प्रमोशनल टीझर शेअर केला आहे, जो Urduflix या OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे. ही पोस्ट काही मिनिटांतच व्हायरल झाली. एका नेटकऱ्याने टिप्पणी केली की, 'ज्यांना त्यांचा घटस्फोट झाला आहे असे वाटते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली'तर दुसर्‍याने लिहिले की, "ते निश्चितपणे घटस्फोटित आहेत.

Shoaib Malik Wishes Sania Mirza On Her Birthday
Ramanand Sagar: 'या' व्यक्तीमुळे सकाळी ९ वाजता देशातील प्रत्येक शहरात लागायचा कर्फ्यू

ते त्यांच्या पोस्टमध्ये एकमेकांना टॅग किंवा उल्लेख करत नाहीत. मला वाटते की ते कायदेशीररित्या बंधनकारक आहे. शोमध्ये त्यांच्या घटस्फोटाची चर्चा होऊ नये म्हणून ते जाहीर करत नसतील." "द्वेष करणाऱ्यांसाठी ही एक मोठी चपराक आहे. तुम्हा लोकांना एकत्र पाहून खूप आनंद झाला,” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.

या दोघांच्याही एका जवळच्या व्यक्तीने नुकताच असा दावा केला की, शोएब मलिक आणि सानिया मिर्झा हे दोघे आधीच वेगळे झाले असल्याने लवकरच त्यांचा घटस्फोट होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com