जॅकलिन फर्नांडिस Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिस कोणत्याही क्षणी अटक? मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी अपडेट

मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसने ईडीवर तिचा छळ केल्याचा आरोप केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jacqueline Fernandez Money Laundering Case: मनी लाँड्रिंग केस प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस जमीन अर्जावर पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी सुरू आहे. मनी लाँड्रिंग केसच्या सुनावणीसाठी जॅकलिनने कोर्टात हजेरी लावली होती. कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान जॅकलिन फर्नांडिसने ईडीवर तिचा छळ केल्याचा आरोप केला आहे. तिच्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचे तिने सांगितले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता पूर्ण झाली आहे. यावर न्यायालय उद्या निर्णय देणार असल्याचे सांगितले जात आहे.

जॅकलीन फर्नांडिसने न्यायालयात सांगितले की, "मी माझ्या कामानिमित्त परदेशात जात-येत असते, तेव्हा मला थांबवण्यात आले. मी गेल्या वर्षी जानेवारीत आईला भेटायला जाणार होतो. पण मला जाऊ दिले गेले नाही. तसेच मी ईडीला यासंदर्भात मेलही केला होता, मात्र त्यांच्याकडून मला कोणताही प्रतिसाद आलेला नाही."

न्यायालयीन सुनावणी दरम्यान जॅकलिनच्या वकिलांनी सांगितले की, "तिने काहीही केले नाही आणि ती तपासात सहकार्य करत आहे. मात्र या प्रकरणात ईडी तिला त्रास देत आहे. जॅकलिन स्वत: सरेंडर झाली असून न्यायालयाने तिला जामीनही मंजूर केला आहे.

सुनावणी सुरू होताच न्यायालयाने ईडीच्या वकिलांना खटल्याशी संबंधित सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर करण्यास सांगितल्या. कोर्टात सुनावणी दरम्यान ईडीच्या वकिलांनी सांगितले की, तुम्ही पिक अॅंड चुजचे धोरण का स्वीकारत आहात. यावर ईडीने न्यायालयाला सांगितले की, जॅकलिनला पुराव्यांचा सामना करावा लागला तेव्हा तिने वस्तुस्थिती सांगितली. जॅकलिन ही परदेशी नागरिक असून तिचे कुटुंब श्रीलंकेत राहते. डिसेंबर 2021 मध्ये जॅकलीनने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. (High Court)

ईडीचे हे म्हणणे ऐकून न्यायालयाने प्रश्न केला की, जर तुमच्याकडे जॅकलिनविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत, तर तुम्ही तिला अटक का केली नाही? तुम्ही एलओसी (लूकआऊट सर्क्युलर) नोटीस दिली असतानाही तिली अटक का केली नाही? (ED)

ईडीच्या वकिलांनी आरोप केला की, आम्ही आमच्या संपूर्ण आयुष्यात ५० लाख रुपये एकत्र पाहिले नाहीत, मात्र जॅकलीनने केवळ तिच्या मौजमजेसाठी ७.१४ कोटी रुपये खर्च केले. जॅकलिनने देश सोडण्याचे सर्व डावपेच अवलंबले आहेत. तिच्याकडे पैशांची कमतरता नाही. आर्थिक गुन्ह्यातील आरोपी देशाचे नुकसान करून कसे पळून गेले, हे सांगण्यासाठी ईडीच्या वकीलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अहवल दिला.

जॅकलिनच्या वकिलाने सांगितले की, तिने या खटल्यादरम्यान वापरलेल्या फोनबद्दल विचारण्यात आले होते, तिने तो फोन ईडीला दिला आहे. ती ज्याच्याशी फोनवर बोलत होती तो माणूस (सुकेश) तिला सतत मूर्ख बनवत होता हे तिला अजिबात माहित नव्हते. तिने तपास यंत्रणेला सातत्याने सहकार्य केले आहे. (Jacqueline Fernandez)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT