Ileana D'Cruz announces pregnancy Instagram @ileana_official
मनोरंजन बातम्या

Ileana D'Cruz Announces Pregnancy: इलियाना डिक्रूझने लग्नाआधीच दिली 'Good News': चाहते पडले बुचकळ्यात

Ileana D'Cruz Instagram Post: सध्या ही अभिनेत्री तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे.

Pooja Dange

Ileana D'Cruz Share Good News: इलियाना डिक्रूझ ही एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. बर्फी चित्रपटातील तिचं अभिनयाचे सर्वत्र कौतूक झाले होते. त्यानंतर ती रुस्तममध्ये देखील झळकली होती. सध्या ही अभिनेत्री तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. इलियनाने ती आई होणार आहे, अशी पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

काही वेळेपूर्वीच तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. पहिला फोटो टी-शर्टचे आहे, ज्यावर लिहिले आहे, "साहस सुरू होतंय." तर दुसऱ्या फोटोत एक लॉकेट दिसत आहे, ज्यामध्ये "ममा" असे लिहिले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये इलियानाने लिहिले की, “लवकरच. प्रिये, तुला भेटण्याची प्रतीक्षा करू शकत नाही." (Entertainment Latest News)

ही आनंदाची बातमी शेअर केल्यानंतर इलियाना डिक्रूझ अचानक चर्चेत आली आहे. अनेकजण तिची ही पोस्ट पाहून तिचे अभिनंदन करत आहेत. तसेच तिच्या या मुलाचे वडील कोण, असा प्रश्न अनेकजण तिला कमेंट करून विचारत आहेत. परंतु अद्याप इलियानाचे लग्न झालेले नाही. त्यामुळे तिच्या या पोस्टने सर्वांना धक्का बसला आहे.

इलियानाच्या या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, "पापा कौन है इसका?" दुसऱ्या युजरने लिहिले की, "तुझे लग्न कधी झाले?" तर तिसऱ्याने लिहिले "तुम्ही विवाहित आहात, वडील कोण आहेत?" तर तिथे काही लोक इलियानासोबत अँड्र्यू नीबोनचे अभिनंदन करत आहेत.

अँड्र्यू नीबोन हा ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर आहे. काही वर्षांपूर्वी दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. एकेकाळी या दोघांच्या लग्नाची अटकळ होती. मात्र, 2019 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले.

त्यानंतर अशीही चर्चा होती की इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत आहे. मात्र, दोघांकडूनही रिलेशनशिपमध्ये असल्याबद्दल काहीही सांगण्यात आले नाही. आता अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी शेअर केली आहे, ज्यामुळे लोक गोंधळले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, पाहा VIDEO

Maharashtra Rain Live News: मुंबई गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ कंटेनर पलटी

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे धुमशान; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

SCROLL FOR NEXT