Hina Khan canva
मनोरंजन बातम्या

Hina Khan: कॅन्सरशी झुंज देतेय, तरीही चेहऱ्यावर स्मितहास्य; अभिनेत्रीच्या व्हिडीओने जिंकली चाहत्यांची मने

Hina Khan Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री हिना खान काही दिवसांपासून चर्चेत आहे. अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. व्हिडिओ पाहून चाहत्यांनी केलं हिनाचं कोतुक.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. काल इंडस्ट्रीतील एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला बॉलिवूडपासून टीव्हसृष्टीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला कार्तिक आर्यन, करिश्मा कपूर, पंकज त्रिपाठी, शर्वरी वाघ, सोनू सूद आणि अनन्या पांडे या कलाकारांनी देखील हाजेरी लावली होती. अभिनेत्री हिना खानने देखील या कार्यक्रमाला हाजेरी लावली होती. हिना सध्या ब्रेस्ट कॅन्सरची ट्रिट्मेंट घेत आहे. काही दिवसांपूर्वी हिनाने केमोथिअरपी घेतली आणि त्यामुळे तिला म्युकोसिटिस नावाचा आजार झाला होता. याबाबत अभिनेत्रीनं तिच्या सोशल मीडियावर माहिती दिली होती.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. दरम्यान हिनाने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हिनाने फंक्शनमध्ये पिंक कलरचा सूट परिधान केला होता आणि त्यासोबतच डोक्यावर केसांचे विगही घातलं होतं.

हा व्हिडिओ पाहून चाहते हिनाचं भरभरुन कौतुक करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हिना कार्यक्रमाला पोहचताच करिशमा कपूरला तिच्या जागेवरून उठवते आणि तिला घट्ट मिठी मारते. त्यानंतर बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा हिनाला हाथ जोडून नमस्कार करते. त्यानंतर अभिनेत्री हिना खान अनन्याला जाऊन भेटते आणि तिच्याशी संवाद साधते. सध्या हिना ब्रेस्ट कॅन्सरशी झुंजत आहे. अशा परिस्थितीमध्ये हिना अनेक कार्यक्रमांमध्ये दिसतेय. चाहते हिनाचे भरभरुन कौतुक करताना दिसतात. चाहत्यांकडून हिनाला जोरदार पाठिंबा मिळत आहे. हिना तिचा प्रवा चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. नुक्ताच हिनाने तिचे केस कापले आहेत.

काल झालेल्या कार्यक्रमचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हिनाचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी तिचे खपर कोतुक केले आहे आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. आजारपणामघ्ये सुद्ध हिना कार्यक्रमांमध्ये दिसतेय हे कौतुकास्पद आहे. चाहत्यांनी तिला लवकर ठणठणीत होण्यासाठी आशिर्वाद देखील दिले आहेत. मागच्या आठवड्यात हिनाने एका कार्यक्रमामद्ये लाल लेहंगा घालून रॅंप लॉक केला होता त्यावेळी देखील हिना एकदम हटके अंदाजामघ्ये दिसत होती.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर अफवांचा पाऊस, पडद्यामागील सत्य आलं समोर

EPFO Update: पीएफ खात्यातून पैसे काढण्याची झंझट संपणार; ATM ची सुविधा कधीपासून सुरू होणार, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितली तारीख

Fake Friend: तुमच्या आजूबाजूला असलेले फेक फ्रेंड्स कसे ओळखायचे? जाणून घ्या 'या' सिक्रेट टिप्स

Manikrao Kokate News: कॅबिनेटमधून कोकाटे आऊट मुंडे इन? मंत्रिपदासाठी मुंडेंची दिल्ली दरबारी फिल्डिंग

Chanakya Niti: फक्त मेहनत अन् शिस्त नव्हे, यशस्वी लोकांची ही गुपितं करा फॉलो, शत्रूही होतील मित्र

SCROLL FOR NEXT