Deepika Padukone Saam TV
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone: दीपिकाच्या चेहेऱ्याचा 'ग्लो' दिवसेंदिवस चर्चेत; जगातील सुंदर महिलांच्या यादीत समावेश

नुकतेच शास्त्रज्ञांनी निकाल जाहिर केल्याप्रमाणे जगातील सर्वात सुंदर स्त्रीचा चेहरा म्हणून दीपिकाची निवड करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukon) ही भारतीय प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री आहे. तिने आपल्या निखळ सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. भारताप्रमाणेच आंतरराष्ट्रीय पातळीवर तिची लोकप्रियता अधिक आहे. आता दीपिकाच्या कारकिर्दीत अजून एक मानाचा तुरा रोवला आहे. जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत तिच्या नावाचा समावेश झाला आहे. तिने आपल्या अभिनयाची सुरुवात ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून केली होती. (Bollywood Film) (Bollywood Actress)

नुकतेच शास्त्रज्ञांनी निकाल जाहिर केल्याप्रमाणे जगातील सर्वात सुंदर स्त्रीचा चेहरा म्हणून दीपिकाची निवड करण्यात आली आहे. या यादीत दहा महिलांची नावे जाहीर करण्यात आली असून, यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही आपले स्थान निर्माण केले आहे. दीपिका पदुकोण ही एकमेव भारतीय महिला आहे. तिचे नाव जगातील दहा सुंदर महिलांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. एकदा जाणून घेऊया यात कोणकोणत्या महिलांचा यामध्ये समावेश झाला आहे.

शास्त्रज्ञांनी जाहिर केल्याप्रमाणे जगातील सर्वात सुंदर महिलांच्या चेहऱ्यांचे सौंदर्य प्रमाण मोजण्यासाठी एका प्राचीन ग्रीक तंत्रे वापरत कम्प्युटरवर मॅपिंग धोरण वापरत निष्कर्ष काढला. या पद्धतीला 'गोल्डन रेशो ऑफ ब्युटी' असेही संबोधतात. त्याच्या तंत्रानुसार जोडी कॉमरला जगातील सुंदर महिलेचा किताब घोषित झाला आहे. सोबतच बियॉन्से आणि किम कार्दशियन यांनीही पहिल्या १० नावांमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही जगातील १० सर्वात सुंदर महिलांच्या यादीत समावेश झालेली एकमेव भारतीय अभिनेत्री ठरली आहे. या यादीत दीपिका नवव्या क्रमांकावर आहे. तिला ९१.२२ गुण मिळाले आहेत.

प्राचीन ग्रीकच्या मते, एखाद्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावरील विशिष्ट गुणोत्तरानुसार सौंदर्य मोजले जाऊ शकते. या यादीत झेंडाया, बेला हदीद, बियॉन्से, एरियाना ग्रांडे, टेलर स्विफ्ट, जॉर्डिन डन, किम कार्दशियन, दीपिका पदुकोण आणि होयॉन जंग या १० महिलांनी आपले स्थान पटकावले आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Alert : महाराष्ट्रावर वादळी संकट? राज्यात पुढील ५ दिवस महत्त्वाचे, कोकण-मराठवाडासह अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, वाचा IMDचा इशारा

Dadpe Pohe Recipe : नाश्त्याला बनवा चटपटीत दडपे पोहे, वाचा अस्सल पारंपरिक रेसिपी

गौरव खन्ना की अमाल मलिक कोण उचलणार 'Bigg Boss 19'ची ट्रॉफी? सोशल मीडियावर कुणाच्या नावाची चर्चा

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Pune : ऊसाच्या शेतात लपलेला नरभक्षक बिबट्या शार्पशूटरकडून ठार, शिरूरमध्ये तिघांचा घेतला होता जीव

SCROLL FOR NEXT