Deepika Padukone  CANVA
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone : 'सिंगम अगेन'च्या ट्रेलरमधील 'त्या' सीनमुळे दीपिका होतेय ट्रोल; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Deepika Padukone gets Trolled by Netizen: दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. ट्रेलर लॉंचनंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणला नटकऱ्यांनी भरपूर ट्रोल केलं आहे.

Saam Tv

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'सिंघम अगेन' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाची पहिली झलक निर्मात्यांकडून त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. चित्रपटामध्ये बॉलिवूडची सुप्रसिद्ध आणि नुकताच आई झालेली अभिनेत्री दीपिका मुख्य भूमिका साकताना दिसणार आहे. चित्रपटाची पहिली झलक पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

दोन दिवसांपूर्वी 'सिंघम अगेन' या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला होता. हा ट्रेलर जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लॉंच करण्यात आला होता. 'सिंघम अगेन' हा २०२४मधील बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची कथा रामायणापासून प्रेरित असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे.

'सिंघम अगेन' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेता अजय देवगण, करिना कपूर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. परंतु, ट्रेलर लॉंच झाल्यानंतर दीपिकाला नेटकऱ्यांनी भरपूर ट्रोल केलं आहे. 'सिंघम अगेन' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दीपिकाच्या अभिनयामुळे प्रेक्षक तिच्यावर संतापले आहेत. दरम्यान सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून दीपिकाच्या अभिनयावर टीका केली जात आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. परंतु, ट्रेलर लॉंचनंतर प्रेक्षकांमध्ये दीपिकाच्या अभिनयामुळे काहीशी नाराजी पाहायला मिळाली होती. चित्रपटामधील दीपिकाच्या फेक अभिनयामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाना सादला आहे.

'सिंघम अगेन' या चित्रपटामध्ये दीपिका शक्ती शेट्टी नावाच्या पेलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिका पदुकोणला मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटामध्ये दीपिकाने ओवर अ‍ॅक्टिंग आणि फेक अ‍ॅक्सेट वापरले आहे अशी काही प्रेक्षकांचे मत आहे. नेटकऱ्यांच्या ट्रोलींगनंतर चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळणार का हे पाहाणं रंजक ठरणार आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

SCROLL FOR NEXT